Prateek Yadav, Son of Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav, Dies After Feeling Unwell

Lokmat
Prateek Yadav, Son of Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav, Dies After Feeling Unwell
Full News
Share:

Prateek Yadav Death:उत्तर प्रदेशमधूनएक धक्कादायक बातमी समोर आली असून, समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगतमुलायम सिंह यादवयांचे पुत्र प्रतीक यादव यांचे आज निधन झाले. फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक यादव यांचा वयाच्या अवघ्या ३८ वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. VIDEO | Lucknow, Uttar Pradesh: Mortal remains of Prateek Yadav, younger son of Samajwadi Party founder Mulayam Singh Yadav and step brother of Akhilesh Yadav, being taken for post mortem.(Source: Third Party)(Full video available on PTI Videos -https://t.co/n147TvrpG7)pic.twitter.com/FrV8MYrGwJ मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने लखनौ येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यामृत्यूचेनेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, शवविच्छेदन अहवालानंतरचमृत्यूचेकारण स्पष्ट होईल. प्रतीक यादव हेमुलायम सिंह यादवआणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. राजकीय वारसा लाभलेला असतानाही प्रतीक यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवले. त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून एमबीए पूर्ण केले होते. राजकारणात येण्याऐवजी त्यांनी रिअल इस्टेट आणि फिटनेस उद्योगाला पसंती दिली. प्रतीक यादव हे फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जात. लखनौमध्ये त्यांचा स्वतःचा जिमचा मोठा व्यवसाय आहे. दरम्यान, २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले होते की, आपल्याला राजकारणात रस नसून व्यावसायिक प्रगतीवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. पक्षातून अनेकदा त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा पक्षात कोणतेही पद स्वीकारले नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

Prateek Yadav, Son of Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav, Dies After Feeling Unwell | Achira News