Achira News Logo
Achira News

1919 क्रीडा क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत आय. पी. एल. सामन्यांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट

Lokmat
1919 क्रीडा क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत आय. पी. एल. सामन्यांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को:वेर्णा येथील १९१९ स्पोर्टस क्रिकेट स्टेडियमवर पुढील तीन वर्षांत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) टी२० सामने आयोजित करण्याचे स्वप्न आहे. आयपीएल सामने घेण्यासाठी प्रेक्षक क्षमता २५-३० हजार असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे स्टेडियमचे मालक आणि चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी सांगितले. सध्या स्टेडियमवर 'वर्ल्ड लेजंड प्रो टी-२० लीग' चालू असून त्यात भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. कमलाप्रसाद यादव म्हणाले की, या स्पर्धेमुळे गोव्यात आर्थिक उलाढाल वाढली असून स्थानिकांसह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. भविष्यात अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे आयोजित करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. स्टेडियमवर 'वूमन प्रीमिअर लीग टी२०' चे सामने आयोजित करण्यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षणाचे आयोजित केले असून त्यात ८० मुलांनी क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. पुढच्या ६ महिन्यांत या स्टेडियमवर मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण आणि युवा क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचेही कार्यक्रम आखण्यात आले आहेत, ज्यामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचा दर्जा वाढेल, असेही कमलाप्रसाद यादव म्हणाले. भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' क्रिकेट संघ व्हावा यासाठी गोव्यातील नामवंत उद्योजकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे कमलाप्रसाद यादव म्हणाले. भविष्यात गोव्याचा 'आयपीएल टी-२०' आणि 'वूमन प्रीमिअर लीग टी-२०' संघ असावा, असे माझे स्वप्न असून त्यासाठी मी पुढाकार घेऊन संघ तयार करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत या मैदानावर अनेक स्पर्धा होणार असल्याची माहिती दिली. आम्हालागोवासरकार आणिगोवाक्रिकेट अकादमीकडून उत्कृष्ट पाठिंबा मिळत असल्याचे यादव यांनी सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

1919 क्रीडा क्रिकेट स्टेडियम 2025 पर्यंत आय. पी. एल. सामन्यांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट | Achira News