या वर्षातील २०२६ सालातील पहिले सूर्यग्रहण हे फेब्रुवारी महिन्यात लागणार असून हे ग्रहण अमावस्येच्या तिथीला लागणार आहे. सूर्यग्रहणाचा सुतककाळ हा १२ तास आधीपासून लागणार आहे. यावेळी काही नियम पाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. ग्रहणातील अन्न खाऊ नये,ग्रहणकाळात देवांना पाण्यात ठेवावे व गर्भवती महिलांनी ग्रहण पाळावे असे काही नियम आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही याबाबत चर्चा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे राहू आणि केतुमुळे लागते. त्यामुळे ग्रहणानंतर काही उपाय दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. पाहुयात हे ग्रहण भारतात दिसणार का? व ग्रहणाची नेमकी तारीख व सुतककाळ काय असेल.सूर्यग्रहण कोणत्या राशीत लागणारया वर्षातील पहिलेसूर्यग्रहणहे कुंभ राशीत लागणार आहे. यावेळी सूर्य हा कुंभ राशीत भ्रमण करत असणार आहे आणि राहू देखील त्याच राशीत असल्याने हे ग्रहण लागेल. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.सूर्यग्रहण वेळ आणि तारीखफाल्गुन अमावस्येला लागणारे हे पहिले सूर्यग्रहण १६ फेब्रुवारी मंगळवारी लागणार असून हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. पंचांगानुसार सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी संपेल. ग्रहणाचा सुतककाळ १२ तास आधी सुरु होत असल्याने भारतीय वेळेनुसार ग्रहणाचे सुतक मध्यरात्री ३ वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल.सूर्यग्रहण कुठे दिसणार?हे कंकणाकृती सूर्यग्रहण हे दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण भागांमध्ये जसे की साऊथ आफ्रिका,झिम्बावे,टांझानिया,नामिबिया,मॉरिशस,बोत्स्वाना,मोझाम्बिक या ठिकाणी दिसेल. तसेच अंटार्टिक आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण भागांमध्ये म्हणजेच दक्षिण अर्जेंटिना,चिली याठिकाणी दिसेल. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने याचा सुतककाळ भारतात पाळला जाणार नाही.
2026 चे पहिले सूर्यग्रहणः नियम, दृश्यमानता आणि ज्योतिषीय परिणाम
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.