Achira News Logo
Achira News

'9 माइंड्स क्रिएशन'सारख्या विनोदी कार्यक्रमावर मराठी अभिनेता गौरव मोर यांचे लक्ष

Maharashtra Times
'9 माइंड्स क्रिएशन'सारख्या विनोदी कार्यक्रमावर मराठी अभिनेता गौरव मोर यांचे लक्ष
Full News
Share:

मुंबई -मराठी अभिनेता गौरव मोरेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या गौरव मोरेनं अचानक हास्यजत्रा सोडली, त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. गौरव मोरेला हास्यजत्रेनं ओळख मिळाली आणि त्यानं अचानक हा शो सोडला, यामागचं कारण काय असेल? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गौरव मोरेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं कारण सांगितलं आहे. त्याचबरोबर त्यानं ओंकार भोजनेबद्दलही भाष्य केलं आहे.गौरवने सांगितलं हास्यजत्रा सोडण्याचं कारणगौरव मोरेनं नुकतीच '९ Minds Creation' या युट्युब चॅनललामुलाखतदिली. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्याला त्यानं हास्यजत्रा का सोडली? असं विचारण्यात आलं. त्यावर गौरव मोरे म्हणाला की, 'ते म्हणायला लागले, तुमचं काम शो सारखंच होतंय आणि मला रोल पण तसेच यायला लागले. एक येतो आणि म्हणतो, 'हॅलो...तुमचा रोल मस्तय. तुम्ही येता...मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही खूप कॉमेडी करता. काय करायचं मी? ते विचारायचे, सर, तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी एक मस्त रोल आहे. हिरो आणि हिरोईन असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही येता...त्यांच्या घरात प्रॉब्लेम होतात...तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. तेच सारखं सारखं व्हायला लागलं. मला वाटलं, आपण ब्रेक घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी थांबलो. वर्षभर मी काहीच केलं नाही. फक्त 'मॅडनेस मचायेंगे' चे एपिसोड केलेले कारण, मला हिंदीतून बोलावलेलं. बाकी मला हे नाही करायचं, असं माझं काहीच नव्हतं.'Tharala Tar Mag : बेलसाठी नागराजचे प्रयत्न, खुनशी वृत्तीच्या नागोबा विरोधात सुमन ठामपणे उभी; 'माझा नवरा नीच' म्हणत कोर्टाला दिली साक्षओंकार भोजनेबद्दल काय म्हणाला?याच मुलाखतीदरम्यान गौरवला ओंकार भोजनेबद्दल विचारण्यात आलं. त्यावरअभिनेताम्हणाला, 'त्याच्यासारखा नट नाही. पुढच्या १०-१५ वर्षात येणारसुद्धा नाही.'गौरव मोरेचा अनोखा किस्सा, ऐकल्यावर हसून हसून लोळालपुढे गौरवला 'तुझं पुढचं स्वप्न काय आहे?' विचारण्यात आलं. यावर गौरव म्हणाला, 'मी नॅशनल अवॉर्ड घेणार, मला सन्मानित करणार. तोफोटोमी घरात फ्रेम करून लावणार. कोणी मला विचारलं, तू काय केलंस? मी त्याला हात धरून घेऊन जाऊन तो फोटो दाखवेन.'

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'9 माइंड्स क्रिएशन'सारख्या विनोदी कार्यक्रमावर मराठी अभिनेता गौरव मोर यांचे लक्ष | Achira News