Achira News Logo
Achira News

IPL 2026: दुखापतीमुळे जॅक एडवर्ड्स संघाबाहेर, सनरायझर्स हैदराबादकडून बदली खेळाडूची मागणी

Maharashtra Times
IPL 2026: दुखापतीमुळे जॅक एडवर्ड्स संघाबाहेर, सनरायझर्स हैदराबादकडून बदली खेळाडूची मागणी
Full News
Share:

मुंबई:आयपीएलला 28 मार्च 2026 पासून सुरुवात होणार आहे. आता IPL 2026 पूर्वी अनेक बातम्या समोर येत आहे. आयपीएलपूर्वी अनेक संघामधील खेळाडू दुखापतीचा सामना करत आहेत. अनेक दुखापत खेळाडूंसाठी आता बदली खेळाडूंची शोधाशोध सुरु झाली आहे. या दरम्यान आता काव्या मारनसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबादसंदर्भात माहिती समोर आली आहे.सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियनअष्टपैलू खेळाडू Jack Edwards आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. जॅकने आपल्या कारकिर्दीत फक्त एकचटी20 आंतरराष्ट्रीय सामनाखेळला आहे, पण त्या एका सामन्यात त्याने मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना प्रभावित केले होते. त्यामुळेच हैदराबादने आयपीएल लिलावात त्याला 3 कोटी रुपयांना विकत घेतले होते.जॅकने आतापर्यंत 77 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 121.50 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजीत 853 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने 8.32 च्या इकॉनॉमी रेटने 52 बळी घेतले आहेत. संघाला त्याच्या अष्टपैलू क्षमतेवर विश्वास होता. जॅक एडवर्ड्स हा हैदराबाद संघातील दुखापतग्रस्त होणारा दुसरा खेळाडू आहे. कर्णधार पॅट कमिन्स आधीच पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आणि सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत, इशान किशन संघाचे नेतृत्व करेल. अभिषेक शर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कमिन्स बरा होईपर्यंत इशानच कर्णधार राहील.19 मार्च रोजी, तीन वेगवान गोलंदाज आयपीएल 2026 मधून बाहेर झाले. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा नॅथन एलिस आणि राजस्थान रॉयल्सचा सॅम करन यांचा समावेश आहे. पंजाब किंग्सच्या लॉकी फर्ग्युसननेही सांगितले आहे की, त्याच्या होणाऱ्या बाळाच्या जन्मामुळे तो हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण सामने खेळू शकणार नाही.सॅम करनदेखील दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर झाला आहे, ज्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, लॉकी फर्ग्युसनने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला नुकतेच पहिले बाळ झाले आहे, त्यामुळे तो हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकणार नाही.सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आता परदेशी अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात आहेत. मात्र, हैदराबादच्या गोलंदाजीत पुरेसे पर्याय नाहीत, विशेषतः पॅट कमिन्सच्या दुखापतीनंतर. त्यामुळे, ते स्पेन्सर जॉन्सन किंवा जेराल्ड कोएत्झीसारख्या वेगवान गोलंदाजांचाही विचार करू शकतात. या संघांसाठी नवीन खेळाडू आणणे आवश्यक झाले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

IPL 2026: दुखापतीमुळे जॅक एडवर्ड्स संघाबाहेर, सनरायझर्स हैदराबादकडून बदली खेळाडूची मागणी | Achira News