IPL 2026 MI vs LSG : आयपीएल २०२६ स्पर्धेत संघर्षाचा सामना करणारामुंबई इंडियन्सचासंघ वानखेडेच्या घरच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात मोठ्या बदलासह मैदानात उतरला आहे. नियमित कर्णधारहार्दिक पांड्याप्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला असून त्याच्या जागीसूर्यकुमार यादवनाणेफेकीसाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरून रोहित शर्मा या सामन्यातून कमबॅक करत असल्याचे सांगतानाहार्दिक पांड्यासंघात का नाही? तेहीसूर्यकुमार यादवनंनाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले. 🚨 Toss Update 🚨@mipaltanwon the toss and elected to field against@LucknowIPL.Surya Kumar Yadav is captaining#MIas Hardik Panyda is unwell.Updates ▶️https://t.co/elXSOvaeig#TATAIPL|#KhelBindaas|#MIvLSGpic.twitter.com/eQjzr2GXrm मुंबई इंडियन्सवरका आली कॅप्टन बदलण्याची वेळ? आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील MI च्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना हा बदल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा आहे. पण नाणेफेकीनंतर सूर्यानं MI च्या ताफ्यातील नेतृत्वाबदलामागचं खरं कारण स्पष्ट केले. हार्दिक पांड्याची तब्येत ठिक नाही, त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही, असे सूर्याने सांगितले. मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक/फलंदाज.), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, रघु शर्मा लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हनमिचेल मार्श, एडन मार्कराम, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान, प्रिन्स यादव
IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे सूर्यकुमार यादवला संधी
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.