Achira News Logo
Achira News

SRH VS GT: सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय

Loksatta
SRH VS GT: सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय
Full News
Share:

IPL 2025, SRH vs GT Live Match Updates:दमदार सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची लय हरवली आहे. जोरदार आक्रमण हाच पवित्रा घेऊन खेळणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांचे कच्चे दुवे प्रतिस्पर्धी संघांना लक्षात आले आहेत. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना नव्याने तयारी करून मैदानात उतरावे लागणार आहे. त्याचवेळी हैदराबादला गोलंदाजीची आघाडीही बळकट करावी लागणार आहे. घरच्या मैदानावर त्यांच्यासमोर सातत्यपूर्ण खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर या त्रिकुटावर गुजरातची भिस्त आहे. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा उत्तम फॉर्मात आहेत. IPL 2025, Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans LIVE Match Updates सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स साई किशोरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात हेनरिच क्लासन आणि नितीश रेड्डी यांना अडकवलं आहे. क्लासनने २७ तर नितीशने ३१ धावांची खेळी केली. ही जोडी हैदराबादला मोठी धावसंख्या गाठून देणार असं चित्र होतं. मात्र साईकिशोरने सामन्याचं पारडं गुजरातच्या दिशेने फिरवलं. चाचपडत खेळणाऱ्या इशान किशनला प्रसिध कृष्णाने माघारी धाडलं. इशानने १७ धावा केल्या. हैदराबादने २ विकेट्सच्या मोबदल्यात अर्धशतक पार केलं आहे. इशान किशान आणि नितीश रेड्डी यांच्यादरम्यान धावताना गोंधळ पाहताना मिळाला. मोहम्मद सिराजने धोकादायक ठरू शकेल अशा अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेकने १६ चेंडूत १८ धावा केल्या. तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ट्रॅव्हिस हेडला मोहम्मद सिराजने तंबूत परतावले. त्याने ८ धावा केल्या. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाजहर्षल पटेलगुजरातविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकता संधी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरू झाल्यापासून वॉशिंग्टन सुंदरला संधी का मिळत नाही यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. आज अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळतो आहे. सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरला कॅप देण्यात आली. त्यामुळे तो अंतिम अकरात असणार हे स्पष्ट झालं आहे. हैदराबादच्या मैदानावर फलंदाज धावांची टांकसाळ उघडतात. तोच इतिहास कायम राहिला तर रविवारी संध्याकाळी चाहत्यांना चौकार-षटकारांची लयलूट अनुभवता येईल. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा वैयक्तिक कारणांसाठी मायदेशी परतला आहे. तो रविवारच्या लढतीत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत गुजरातने तीनच विदेशी खेळाडूंना संघात खेळवलं होतं. जोरदार फॉर्मात असणाऱ्या ग्लेन फिलीप्सला संधी मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रबाडाऐवजी गुजरातने भारताचा अनुभवी इशांत शर्मावर विश्वास ठेवला आणि त्याने तो सार्थ ठरवला. रबाडाऐवजी गेराल्ड कुत्सिया या उमद्या वेगवान गोलंदाजांलाही संधी मिळू शकते. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला विजयात सातत्य राखण्याचा मंत्र गवसला आहे.शुबमन गिल,साई सुदर्शन आणि जोस बटलर उत्तम फॉर्मात आहेत. दुसरीकडेमोहम्मद सिराज,प्रसिध कृष्णा,इशांत शर्मायांच्यासह साई किशोर विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत आहेत. सलामीच्या लढतीत २८२ धावांचा डोंगर उभारून दणदणीत विजय मिळवणाऱ्या हैदराबादची नंतर मात्र चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान, किशन,नितीश कुमाररेड्डी आणि हेनरिच क्लासन या पंचकाला कसं रोखायचं हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कळलं आहे. रविवारी घरच्या मैदानावर पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची संधी या पाचही जणांकडे आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

SRH VS GT: सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय | Achira News