Achira News Logo
Achira News

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Lokmat
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी
Full News
Share:

अजित पवारयांच्याअपघातीमृत्यूनंतर, काही नेत्यांकडून, याअपघाताचीसखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यातच आता, "घटनेची चौकशी फक्त DGCI ने किंवा CID ने करून चालणार नाही, तर ही चौकशी हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखालीच व्हायला हवी," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर आपण, केंद्रीय मंत्रीनितीन गडकरीयांनाही, तुम्ही त्या छोट्या, खासगी विमानाने प्रवास टाळायला हवा, असे सांगणार आहोत, असेही देमुख यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, "अजित पवारयांचा विमान अपघातात जो दुर्दैवी मृत्यू झाला, यासंदर्भात अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित दादांच्या पक्षाचे जे जेष्ठ नेते आहेत. माननीय छगनजी भुजबळ असोत किंवा दादांच्याच पक्षाचे काही आमदार असोत. बाहेरच्यांनीही शंका व्यक्त केली आहे की, हा अजितदादाचा अपघात आहे की घातपात आहे? कारण अनेकांना शंका आहे कि, जेव्हा हा अपघात झाला त्या वेळी नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले की बारामतीच्या एअरपोर्टवर व्हिजिबिलीटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल. पण असं आहे कि व्हिडिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टवर आलं, तेव्हा आपणही बघितले असेल की, अनेकांनी त्या विमानाचा व्हिडिओ घेतला आणि दोन किलोमिटरवरूनही त्या विमानाचा व्हिडिओ अगदी स्पष्ट आला. जर धुकं असतं तर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर एवढ्या दुरून तो व्हिडिओ आला नसता आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतंय की, हा घातपात आहे का? यामुळे सर्व चिंतित आहेत की, वस्तुस्थिती समोर यायला हवी. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझंसुद्धा समर्थन आहे.""आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमाने तर होईल, पण त्यांच्यावर हायकोर्टाच्या जजच्या नियंत्रणाखाली व्हायला हवी. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहेत? काय घडलं? काय नाही? घातपात आहे? की अपघात आहे? हे सर्व जनतेसमोर येईल, असेही देशमुख म्हणाले. केंद्रीय मंत्रीनितीन गडकरीयांचं नाव घेत काय म्हणाले देशमुख? -अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असे संजय राऊत बोललेत, असे वाटते तुम्हाला? असे विचारले असता, "आता त्यांना शंका आहे म्हणून संजय राऊत बोलले. मी धेखील काही माध्यमांना बोललो की, माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला विमानतळावर वैगेरे भेटले तर, मी त्यांना नक्की सांगेन की तुम्हीसुद्धा त्या छोट्या, जी खासगी विमानं आहेत, त्यांनी तुमचा प्रवास टाळायला हवा," असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी | Achira News