थोडक्यात:इंटरमिटंट फास्टिंग ही ठराविक वेळेत खाण्याची आणि उर्वरित वेळ उपवास करण्याची सोपी आणि लवचिक पद्धत आहे.ही पद्धत वजन कमी करण्यास मदत करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.मधुमेह रुग्णांनी ही पद्धत अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.Can intermittent fasting reverse type 2 diabetes naturally:अलीकडच्या काळात इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच ठराविक वेळेच्या कालावधीतच जेवण्याची आणि उर्वरित वेळेत उपवास ठेवण्याची पद्धत प्रसिद्ध झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण ही पद्धत अवलंबत आहेत, कारण ती सोपी, लवचिक आणि औषधांपेक्षा नैसर्गिक उपाय मानली जाते.संशोधनांनुसार ही पद्धत इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, रक्तातील साखर कमी करते आणि काही रुग्णांमध्ये औषधांशिवायही साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.इंटरमिटंट फास्टिंग (IF) ही एक खाण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यामध्ये ठराविक वेळेत खाणे आणि उर्वरित वेळ उपवास करणे याचा समावेश असतो. पारंपरिक आहारापेक्षा ही पद्धत तुम्हीकायखाता यावर नव्हे, तरकेव्हाखाता यावर लक्ष केंद्रित करते. या पद्धतीत जेवण ठराविक तासांच्या कालावधीत घेतले जाते आणि उर्वरित वेळ उपाशी राहिले जाते. यामुळे शरीर ग्लुकोजऐवजी साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते, जे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होणे, HbA1c ची पातळी घटणे आणि शरीराचे चयापचय सुधारणे अशा सकारात्मक परिणामांची नोंद झाली आहे.400 हून अधिक टाइप 2 मधुमेही रुग्णांवर करण्यात आलेल्या एका ट्रायलमध्ये, फास्टिंग करणाऱ्यांमध्ये औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत रक्तातील साखर अधिक नियंत्रणात आल्याचे आढळले, तसेच त्यांचे वजन सरासरी 10 किलोने कमी झाले आणि रक्तदाब, कंबरेचा घेर व कोलेस्टेरॉलची पातळीही सुधारली.चीनमध्ये झालेल्या एका छोट्या अभ्यासात इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे निम्मे रुग्ण औषधांशिवाय साखर नियंत्रणात ठेवू शकले, तर काही रुग्णांनी दीर्घकाळ इन्सुलिनवर असतानाही एका महिन्याच्या आत इन्सुलिन घेणे पूर्णपणे थांबवले.इन्सुलिन प्रतिकार कमी होतो:इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीरात इन्सुलिनची पातळी घटते आणि पेशींमध्ये संवेदनशीलता वाढतेवाढलेली चरबी कमी होते:विशेषतः यकृत आणि पॅन्क्रिॲजभोवतीची चरबी कमी होऊन आरोग्य सुधारतेऊर्जेचा स्त्रोत बदलतो:इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीर साखरेऐवजी चरबी आणि केटोनचा वापर करू लागतंहार्मोनल समतोल:भूक आणि समाधान हे दोन्ही नियंत्रित ठेवणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन सुधारतेडॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही आधीच काही औषधे घेत असाल तरब्लड शुगर नियमित तपासा12:12 किंवा 14:10 यासारख्या सौम्य पद्धतीने सुरुवात कराआहारात पोषक घटकांचा समावेश करा, जसे की फायबर, सत्वयुक्त चरबी, प्रथिनं आणि गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स
अधूनमधून उपवास केल्याने टाइप 2 मधुमेह नैसर्गिकरित्या उलटू शकतो का?
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.