पती-पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यावर टिकलेलं असतं, असं म्हटलं जातं. पण याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटनाउत्तर प्रदेशातीलगाझियाबादमध्ये समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची सुपारी दिली. इतकंच नाही, तर पत्नीवर गोळीबार झाल्यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाणे गाठून ज्याच्यावर संशय होता, त्याच तरुणाविरुद्ध तक्रारही दाखल केली. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे या कपट पतीचा खरा चेहरा समोर आला आहे. गाझियाबादच्या कमिशनर कॉलनी परिसरात राहणाऱ्या अंकितला आपल्या पत्नीचे कुटुंबातीलच एका तरुणाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. हा संशय त्याच्या डोक्यात इतका भिनला की त्याने पत्नीलाच संपवण्याचा आणि त्या तरुणाला जेलमध्ये पाठवण्याचा फुलप्रूफ प्लॅन तयार केला. अंकितने तीन भाडोत्री मारेकऱ्यांशी संपर्क साधला आणि ५० हजार रुपयांत पत्नीच्या हत्येचा सौदा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी गेल्या एका आठवड्यात दोन वेळा अंकितच्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात मात्र शूटर्सनी महिलेवर गोळी झाडली आणि ते तिथून पसार झाले. सुदैवाने, या हल्ल्यातून महिला बचावली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि ती धोक्याबाहेर आहे. पत्नीला गोळी लागल्यानंतर अंकितने तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि ज्या तरुणावर त्याचा संशय होता, त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना तीन संशयित व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व सत्य सांगेन टाकले. त्याने सांगितले की, "दुसऱ्या कोणी नाही, तर स्वतः पती अंकितनेच आम्हाला ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती." पोलिसांनी आता आरोपी पती अंकित आणि सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती पत्नीला संपवण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवतो
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.