Achira News Logo
Achira News

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ

Maharashtra Times
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ
Full News
Share:

Gold-Silver Rate 5 May Latest Update:तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या तीन महिन्यांत सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमतीत घसरण दिसून आली असून सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली गेली आहे तर चांदीचा भाव स्थिर राहिला आहे.जागतिकबाजारात पुन्हा एकदा अस्थिरतावाढली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी भंग झाली असून इराणमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकांना लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीवर (युएई) क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून होर्मुझ संकटादरम्यान इराणने पुन्हा केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्यापासून ते तेलापर्यंतच्या किमतींवर परिणाम झाला.BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूकसोन्या-चांदीचा आजचा दर कायमंगळवारी, 5 मे, सकाळी MCX वर सोन्याचे दर वधारले. देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांनी संधी साधून सोन्यात खरेदी केली ज्यामुळे MCX वर सलग दुसऱ्या दिवशी पिवळसर सोन्याची झळाळी वाढली. मात्र, मजबूत डॉलर आणि महागाईविषयक चिंतेमुळे दरवाढीला काहीशी मर्यादा आली. दुसरीकडे, डॉलर निर्देशांक जवळपास 0.20% वधारला, ज्यामुळे सोन्याच्या मागणीवर दबाव आला.Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार... निवडणूक झाली आता कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणारMCX वरील सोन्याचे जून फ्युचर्स 0.13% वधारून 1,49,526 रुपयांवर ट्रेड करत होते, तर चांदीचे जुलै फ्युचर्स 0.04% घसरून प्रति किलो 2,43,798 रुपयांवर उतरले.वर होते. दरम्यान, बाजाराला यूएस फेडरल रिझर्व्हकडून संकेत मिळाले ज्यामध्ये सध्या तरी व्याजदरांबाबत स्थिर भूमिका कायम ठेवायचे म्हटले गेले.सोने-चांदीच्या दरांवरील दबावाचे कारण कायअमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीच्या संदर्भात, प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीही मंगळवारी मागील सत्रातील एका महिन्याहून अधिक काळातील नीचांकी पातळीवरून वाढल्या. मात्र कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्याने वाढ मर्यादित राहिली, ज्यामुळे महागाईची भीती वाढली आणि व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहण्याची चिंता बळावली.अमेरिकी सैन्याने इराणची अनेक जहाजे नष्ट केली आणि क्षेपणास्त्रे व ड्रोन रोखले, तर दुसरीकडे इराणने सागरी वाहतुकीचे मार्ग विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्यास अहवालतुन समोर आले. या परिस्थितीमुळे चांदीसारख्या मौल्यवान धातूंना असलेली सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कायम राहिली, मात्र मोठी तेजी आणण्याइतकी मजबूत नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ | Achira News