दुबई :होर्मुजच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्याइराणच्यासहा युद्धनौकांना अमेरिकेने उद्ध्वस्त केले असून हा महत्त्वाचा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सोमवारी अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम राबवण्यास सुरूवात केल्यानेइराणनेहल्ले सुरू केले आहेत. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय” यूएईवर इराणचे हल्ले सोमवारी इराणने यूएईच्या फुजैराह येथील तेल केंद्रावर चार क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. या हल्ल्याने तेलकेंद्राला मोठी आग लागली आहे. चार पैकी तीन क्षेपणास्त्रे निकामी तर एक क्षेपणास्त्र समुद्रात पाडल्याचा दावा यूएईने केला आहे. या घटनेची माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. १५ हजार सैनिक आणि १०० विमानांची मदत घेत अमेरिकेने अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ मोहीम सुरू केली आहे.
अमेरिकेने इराणची युद्धनौका उद्ध्वस्त केली, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर होरमुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी उघडली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.