Achira News Logo
Achira News

अमेरिकेने पर्शियन आखातात शस्त्रसंधीची पुष्टी केली, नौवहन मार्गांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात केले

Lokmat
अमेरिकेने पर्शियन आखातात शस्त्रसंधीची पुष्टी केली, नौवहन मार्गांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात केले
Full News
Share:

दुबई :इराणशीझालेला युद्धविराम अद्याप कायम असून अमेरिकेच्या नौदलातील १५ हजाराहून अधिक सैनिक आणि १०० हून लष्करी विमाने पर्शियाच्या आखातातील सागरी मार्गाचे संरक्षण करत असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ आणि जॉइंट चीफ चेअरमन डॅन केन यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या संरक्षणात अमेरिकेच्या दोन जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझचा मार्ग पार केल्याची माहिती या दोघांनी दिली. गरज पडल्यास या प्रदेशात सैन्य संख्या वाढवण्याचा आम्ही विचार करू असे हेगसेथ म्हणाले. “असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन सोमवारीइराणनेअमेरिकेवर हल्ला केल्याचा दावा केला होता. तो दावा अमेरिकेने फेटाळत इराणच्या सहा युद्धनौका उडवल्या असे सांगितले. या घटनेवर इराणने युद्धविरामाचे अमेरिकेने उल्लंघन केल्याचा आरोप केला. पण अमेरिकेने हे हल्ले मोठ्या युद्धाच्या श्रेणीत येत नसल्याचा पवित्रा घेत तांत्रिकदृष्ट्या शांतता करार सुरूच असल्याचे सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोप लिओ चौदावे इराणला मदत करून कॅथलिक धर्मीयांना धोक्यात टाकत असल्याची टीका केली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अमेरिकेने पर्शियन आखातात शस्त्रसंधीची पुष्टी केली, नौवहन मार्गांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात केले | Achira News