कांदा पिकासाठी काढणीनंतरचे हवामान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काढलेला कांदा काही काळ उन्हात वाळवणे आवश्यक असते; मात्र याच काळात पाऊस झाल्यास कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती असते. कांदा ओला झाल्यास तो कुजणे, काळपट पडणे, वजन घटणे तसेच बाजारभावात घसरण होणे अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधीच उत्पादन खर्चाचा बोजा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दुपारनंतर अनेक ठिकाणी ढग दाटून आल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. काहींनी कांद्याच्या ढिगांवर प्लास्टिक कागद टाकले, तर काहींनी उपलब्ध साधनसामग््राीच्या मदतीने कांदा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला.
अवकाळी पावसामुळे या भागातील कांद्याच्या पिकाची गुणवत्ता धोक्यात
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.