Achira News Logo
Achira News

अवकाळी पावसामुळे या भागातील कापणी केलेल्या पिकांची नासधूस

Pudhari
अवकाळी पावसामुळे या भागातील कापणी केलेल्या पिकांची नासधूस
Full News
Share:

तालुक्यातील झरे आणि आसपासच्या भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू आणि हरभरा ही काढणीला आलेली पिके भिजली आहेत. काही ठिकाणी मळणीची कामे सुरू असतानाच पावसाने धडक दिल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. डाळिंब व द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. काही भागात झाडे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय चाऱ्याचेही नुकसान झाल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अवकाळी पावसामुळे या भागातील कापणी केलेल्या पिकांची नासधूस | Achira News