Achira News Logo
Achira News

अशोक खरात घोटाळाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची शिवसेनेची मागणी

Lokmat
अशोक खरात घोटाळाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची शिवसेनेची मागणी
Full News
Share:

Ashok Kharat Case :नाशिक येथीलअशोक खरातप्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहेत. या प्रकरणात खरात याचे ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. "रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांना अटक करावी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती? पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर आणिअशोक खरातयांचे 'सीडीआर' तपासले जावेत. इतकेच नाही तर या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी होणे गरजेचे आहे. चाकणकर या राजकीय दबावाचा वापर करू शकतात, यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीही अंधारे यांनी केली. त्या फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असेही अंधारे म्हणाल्या. स्वत:ची अनामिका कापल्याचा धक्कादायक आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर स्वत: तंत्रमंत्रमध्ये होत्या असा धक्कादायक आरोप केला. याबाबत एका पिडितेने आपल्याला सांगितल्याचा दावा अंधारे यांनी केला. २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चाकणकर यांचे फोटो दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या अनामिकाला बँडेंज लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. संपत्तीची चौकशी करा या प्रकरणात केवळ पोलीसच नाही, तर ED आणि आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष घालण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी म्हटले. खरात याच्या मालमत्ता देश-विदेशात पसरलेल्या आहेत, त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासले जावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. पक्षपाताचा आरोप फेटाळला "यात कुणीही दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई करा. जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांचीही चौकशी करा," असे आव्हान अंधारे यांनी दिले. मात्र, पाटील आणि नार्वेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना रूपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेक पुरावे समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. चाकणकर सध्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, त्या फरार आहेत का? याचा तपासही पोलिसांनी करावा, असे त्या म्हणाल्या. अंधारेंना धमक्यांचे फोन या खळबळजनक प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले. "मला कालपासून ८ वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहेत. अत्यंत घाणेरड्या भाषेत मला धमकावले जात आहे," असेही त्या म्हणाल्या

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

अशोक खरात घोटाळाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याची शिवसेनेची मागणी | Achira News