Achira News Logo
Achira News

'आई हर वाई?': केदार यशोधरा शिंदे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Maharashtra Times
'आई हर वाई?': केदार यशोधरा शिंदे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
Full News
Share:

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘ आई भाड्याने हवी ?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले असून छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.Tharala Tar Mag : प्रियाच्या Ex च्या मदतीने अश्विनसमोर होणार मोठा भांडाफोड, खोटी तन्वी पैसे चारुन साक्षीदारांना करतेय गायब पण सायली अर्जुन आधीच अलर्टदिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘आई भाड्याने हवी?’ या दोन्ही चित्रपटांचे काम २०२३ पासून सुरू झाले. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट मी ज्यांना आदर्श मानतो त्या राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलक देणारा आहे.हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर ‘आई’ या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणं हे माझं ध्येय असतं आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल. शीर्षकातूनच आजच्या काळातील भावनिक तगमग जाणवते. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील ‘आई’ प्रेक्षकांना पाहायला मिळतील. जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल.”Lagnanantar Hoilch Prem : काव्या पार्थला वेगळं करण्याच्या मनसुब्याने रम्या फेक डेटवर! नंदिनीला वाटतोय बहिणीचाच हेवानिर्माती सना शिंदे म्हणतात, “पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्सुकता आहे. पहिला चित्रपट भावनिक अंगाने साकारण्यात आला होता, तर ‘आई भाड्याने हवी?’ हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर आहे. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळेल. मला वैयक्तिकरित्या स्त्रीकेंद्री कथा आवडतात, त्यात ‘आई’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सक्षम आणि प्रभावी व्यक्तिरेखा असते. प्रेक्षकांना आशयघन आणि मनाला भिडणारे चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो, आणि हा चित्रपट त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”Ruchita Jamdar : विशालच्या माझ्या साठीच्या फिलिंग खऱ्या ! रुचिताला विश्वास‘आई भाड्याने हवी?’ या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या तरीही परिणामकारक पद्धतीने भाष्य करणार असल्याचे दिसते. एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार, यात शंका नाही. आता या ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'आई हर वाई?': केदार यशोधरा शिंदे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा | Achira News