Achira News Logo
Achira News

आपल्या राजकीय शत्रूचा निर्णयः भारतीय राजकारणातील एकतेचे आवाहन

Pudhari
आपल्या राजकीय शत्रूचा निर्णयः भारतीय राजकारणातील एकतेचे आवाहन
Full News
Share:

राजकीय वैरी कोण हे ठरवावे लागेल ः उदय सामंत दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघामध्ये जि. प., पं. स. निवडणुकीत युती करू शकलो नाही. त्याबाबत फार काही बोलणार नाही. त्याची कारणे काही असतील. पण, ज्यावेळी आपण एकसंघपणाने लढतो त्यावेळी विजयी होतो हे चिपळूण नगर परिषद निवडणुकीने दाखवून दिले. येथे प्रचारासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपणदेखील होतो. त्यामुळे चिपळूणसारखा इतिहास घडवायाचा असेल तर आपला राजकीय वैरी कोण असेल हे आपण सर्वांनी ठरवायला हवे. आम्ही सांगतो म्हणून उबाठा राजकीय वैरी मानण्यापेक्षा आपण सर्वांनी राजकीय वैरी ठरविला पाहिजे. आपण जि. प.च्या नवीन इमारतीसाठी निधी दिला. चिपळूण न.प.साठी निधी आणला. चिपळूणसाठी 140 कोटीची नळपाणी योजना, नारायण तलाव, सांस्कृतीक केंद्रासाठी निधी साहेब तुम्ही दिलात. निधी कमी पडणार नाही याची खात्री बाळगा आणि शिंदे साहेबांच्या वाढदिनी जि. प. आणि सर्व नऊ पं. समित्या निवडून आणूया, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आपल्या राजकीय शत्रूचा निर्णयः भारतीय राजकारणातील एकतेचे आवाहन | Achira News