Achira News Logo
Achira News

आमिर खानच्या'3 इडियट्स'चा सिक्वेल विकी कौशलसोबत काम करत आहे

Lokmat
आमिर खानच्या'3 इडियट्स'चा सिक्वेल विकी कौशलसोबत काम करत आहे
Full News
Share:

बॉलिवूडच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेचआमिर खानच्याअनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे सगळ्यांचा आवडता 'थ्री इडियट्स'.आमिर खानचंनाव घेतलं की, त्याच्या या चित्रपटाचा उल्लेख हमखास केला जातो. 'थ्री इडियट्स'चे अनेक चाहते या चित्रपटाच्या सीक्वेलची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दलची माहिती देण्यात आली होती. अशातच आता याबद्दल आणखी एक वृत्त समोर आले आहे. या चित्रपटात आता अभिनेताविकी कौशलयाची एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशल या सिक्वेलमध्ये दिसू शकतो. त्याची निर्मात्यांशी चर्चा यशस्वी ठरली, तर तो आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या तिकडीमध्ये सामील होतील. हा चित्रपट पुन्हा एकदाराजकुमार हिरानीदिग्दर्शित करणार आहेत. ते आणि लेखक अभिजात जोशी सध्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. टीमला 'थ्री इडियट्स'च्या यशाला साजेसा सिक्वेल बनवायचा असल्याने पटकथेवर विशेष मेहनत घेतली जात आहे. २०२७ मध्ये सुरू होणार शूटिंग या सिक्वेलचं शूटिंग २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.विकी कौशलयांनी याआधी संजू आणि डंकी या चित्रपटांत हिरानींसोबत काम केलं आहे. चित्रपटाची कथा ही जिथे पहिला भाग संपला होता, तेथून १० वर्ष पुढे असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांचं पुढचं आयुष्य आणि नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, विक्की कौशल सध्या 'महावतार' या चित्रपटात व्यस्त आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आमिर खानच्या'3 इडियट्स'चा सिक्वेल विकी कौशलसोबत काम करत आहे | Achira News