Aamir Khan Shared His Diet Plan : आमिर खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आमिर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अभिनेता खूप शिस्तप्रिय असून, त्यामुळेच त्याला द परफेक्शनिस्ट, असंही म्हटलं जातं. अशातच अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आला आहे. येत्या काळातआमिर खानलवकरच त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच त्यानं नुकतंच १८ किलो वजन घटवल्याचं म्हटलं आहे. आरोग्याच्या कारणांमुळे त्यानं त्याच्या आहारामध्ये बदल केला होता; पण यामुळे त्याला वजन घटवण्यात मदत झाली आणि त्याशिवाय याचे काही फायदेही त्याला जाणवल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी आमिरनं विशिष्ट पद्धतीचा एक डाएट प्लॅन फॉलो केला आहे. वयाच्या साठीत आमिर खान फिटनेससाठी काय करतो आणि त्याचा हा डाएट प्लॅन नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात… ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना आमिर खान म्हणाला, “हे आपसूकच घडलं. मी माझ्या आरोग्याच्या कारणांमुळे एक नवीन डाएट प्लॅन फॉलो करत होतो आणि तो माझ्यासाठी जादूसारखं काम करत आहे.” सातत्यानं मायग्रेनचा त्रास होत असल्यामुळे आमिर खाननं हा नवीन डाएट प्लॅन सुरू केला असल्याचं सांगितलं. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “मी मायग्रेनमुळे हा डाएट प्लॅनसुरू केला. मी अँटी इन्फ्लेमेट्री हा डाएट प्लॅन फॉलो करतो. त्यामुळे माझं वजन फक्त १८ किलो कमी झालेलं नाहीये, तर मायग्रेनचा त्रासही कमी झाला आहे.” अँटी इन्फ्लेमेट्री डाएटमध्ये ताजी फळं, भाज्या आणि पदार्थांचा समावेश असतो. प्रोसेस्ड फुडचं सेवन न करता, अशा प्रकारच्या आहारावर या डाएटमध्ये भर दिला जातो. फळं, पालेभाज्या, मासे आणि नैसर्गिक पद्धतीनं बनलेल्या सर्व पदार्थांचा यामध्ये समावेश असतो. अँटी इन्फ्लेमेट्री डाएटमुळेच आमिर खाननं तब्बल १८ किलो वजन घटवलं असून, त्याचा मायग्रेनचा त्रासही कमी झाल्याचं उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं आहे; पण फिटनेसमुळे लक्ष वेधून घेण्याची आमिर खानची ही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीसुद्धा आमिर खाननं त्याच्या ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटासाठी बरंच वजन वाढवलं होतं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ‘दंगल’ या चित्रपटातील महावीर फोगाट हे पात्र साकारण्यासाठी आमिर खाननं तब्बल ३० किलो वजन वाढवलं होतं. दरम्यान, आमिर खाननं उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी पटेल’ या चित्रपटाची माहिती दिली आहे. त्यानेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्याच्यासह या चित्रपटात त्याचा भाचा इमरान खानसुद्धा झळकत आहे. यावेळी त्यानं “इमरान व मी या चित्रपटात आम्ही केमिओ केले आहेत. मी आजवरच्या माझ्या करिअरमध्ये फार विनोदी भूमिका साकारल्या नाहीयेत; पण तरीसुद्धा आजही लोकांना माझा अंदाज अपना अपना हा चित्रपट आठवतो.” असं म्हटलं आहे.
आमिर खानने त्याच्या आहार योजनेचा खुलासा केलाः पारंपारिक आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा समतोल
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.