इंडियन प्रीमियर लीगच्या ४३व्या सामन्यात मैदानावर मोठे नाट्य पाहायला मिळाले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन यांच्यात वेगळाच सामना रंगला. या सामन्यानंतर जेमिसन म्हणाला की, "मला नाही वाटत की, मी माझ्या आयुष्यात कधी एखाद्या १५ वर्षांच्या मुलाला इतका घाबरलो असेन. पण हो, आम्ही सामन्यापूर्वी योजना आखली होती आणि त्याचा फायदा झाला." राजस्थान रॉयल्सच्या डावातील दुसऱ्या षटकात हा प्रकार घडला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने जेमिसनच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने शानदार चौकार मारला. मात्र, पुढच्याच चेंडूवर जेमिसनने अचूक यॉर्कर टाकत वैभवला क्लीन बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर जेमिसनने आपल्या भावनांवर ताबा गमावला. तो थेट वैभवच्या जवळ गेला, जोरात टाळ्या वाजवल्या आणि त्याच्याकडे रागाने पाहत आक्रमक जल्लोष केला. १५ वर्षांच्या खेळाडूसोबत केलेले हे वर्तन क्रीडाप्रेमींना रुचलेले नाही. जेमिसनचे हे वर्तन आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे ठरले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जेमिसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ चा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. जेमिसनला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. जेमिसनने आपली चूक कबूल केली असून, त्याला भविष्यात मैदानावरील शिस्त पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेमिसनच्या या वागणुकीवर क्रिकेट चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एका १५ वर्षांच्या मुलाला बाद केल्यानंतर अशा प्रकारची आक्रमकता दाखवणे 'जेन्टलमन गेम'च्या भावनेला धरून नसल्याचे मत चाहत्यांनी मांडले आहे. दुसरीकडे, इतक्या स्लेजिंगनंतरही वैभव सूर्यवंशीने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयपीएलः 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर काईल जेमीसनचा संतापजनक आरोप
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.