मुंबई:आता आयपीएल 2026 सुरु होणार आहे. 28 मार्च 2026 रोजी आयपीएलला सुरुवात होणार आहे. आता आयपीएलपूर्वी अनेक संघाबद्दल बातम्या समोर येत आहे. अनेक किस्से समोर येत आहे. आता आयपीएलपूर्वी महेंद्र सिंग धोनीबाबत एक किस्सा समोर आला आहे. धोनीसाठी एक खेळाडू हुक्का बनवतो ही बातमी समोर आली आहे.Mahendrasingh Dhoni हुक्का ओढतो. ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकांनी याआधीही याचा उल्लेख केला आहे. सॅम बिलिंग्स जोआयपीएल 2018 आणि 2019 च्याहंगामात चेन्नई सुपर किंग्ससोबत होता. या इंग्लिश खेळाडूने आता खुलासा केला आहे की, धोनीच्या हुक्क्याची विशेष काळजी घेतली जाते आणि हे काम खलील अहमद सांभाळतो.चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025च्या लिलावात खलील अहमदला 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र, त्यांनी त्याला आयपीएल 2026 साठी कायम ठेवले आहे. आयपीएल 2025 मधील खलीलची दमदार कामगिरी हे त्याला संघात कायम ठेवण्यामागील एक प्रमुख कारण होते. आता असे दिसते की, सॅम बिलिंग्सने जे उघड केले आहे, तो देखील एक घटक असू शकतो.सॅम बिलिंग्सने 'स्टिक टू क्रिकेट' पॉडकास्टवर धोनीच्या हुक्का पिण्याच्या सवयीबद्दल सांगितले. या पॉडकास्ट दरम्यान अॅलिस्टर कूक, फिल टफनेल आणि मायकल वॉन हे देखील उपस्थित होते. त्याने सांगितले की, टीम हॉटेलमधील धोनीची खोली सर्वांसाठी खुली आहे. त्याच्या खोलीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे एक छोटा हुक्का सेटअप. हुक्क्याची देखभाल करण्याची जबाबदारी खलील अहमदवर आहे. सॅम बिलिंग्सच्या मते, धोनीसाठी हुक्का तयार करणे हे खलील अहमदचे एकमेव काम आहे.सॅम बिलिंग्सने दोन हंगामात सीएसकेसाठी 11 सामने खेळले असून, त्यात त्याने केवळ 108 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील ताकद पाहिल्यानंतर, त्यांनी एकदा असे मत व्यक्त केले होते की, सध्या त्यांच्या संघात स्थान मिळवणे जगातील सर्वात कठीण संघांपैकी एक आहे. सीएसके हा एक शानदार आणि शक्तिशाली संघ आहे.
आयपीएल 2026: एम. एस. धोनीच्या हुक्क्याच्या सवयी स्पर्धेपूर्वी उघड
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.