मुंबई:आयपीएल 28 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. आयपीएलपूर्वी अनेक संघ वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहे. काही खेळाडूही मोठे पाऊल उचलताना दिसत आहे. यादरम्यान आता Mahendrasingh Dhoni एका पोस्टने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. आयपीएल 2026 च्या आधी, धोनीनेे नेमके काय संकेत दिले आहे ते पाहा.भारताच्या या स्टार खेळाडूने संकेत दिले आहेत की तो आपला7 नंबरचा जर्सी सोडून 8 नंबरचा जर्सीघालणार आहे. 7 हा केवळ एक आकडा नाही, तर धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी ते एक भावनिक प्रतीक आहे. धोनीचा जन्म 7 व्या महिन्याच्या 7 तारखेला झाला होता, म्हणूनच तो हा जर्सी नंबर घालतो. मग, आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या शेवटी तो आता आपला जर्सी नंबर का बदलत आहे?धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. जेव्हा सीएसकेवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा तो फक्त दोन हंगामांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, धोनी आता केवळ आयपीएलमध्येच खेळतो. असे मानले जाते की आयपीएल 2026 हा त्याचा खेळाडू म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. पण त्याआधी, धोनीने आपल्या पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.एम.एस. धोनी 8 नंबरचा जर्सी घालणार का? धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, "काही अंक आपल्यासोबत राहतात आणि माझ्यासाठी 7 हा त्यापैकीच एक आहे. पण आज, मी तो बदलून 8 करत आहे." व्हिडिओमध्ये 7 क्रमांकाची जर्सी दिसत आहे, पण कोणीतरी ती खाली उतरवून तिथे 8 क्रमांकाची जर्सी टांगते.पण एमएस धोनी आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात जर्सी क्रमांक का बदलत आहे? हाच प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडला आहे. धोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "तुम्हाला योग्य वेळी कारण कळेल." व्हिडिओमध्ये दिसणारी जर्सी सीएसकेची किंवा पिवळी नाही. ती निळ्या रंगाची असून त्यावर भारतीय तिरंग्याच्या पट्ट्या आहेत. पण हा व्हिडिओ धोनीने अधिकृत अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला नाही.
आयपीएल 2026 च्या आधी धोनीच्या जर्सीच्या नंबर बदलण्यावरून वाद
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.