Achira News Logo
Achira News

आयपीएल 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व गाजवले.

Sakal
आयपीएल 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व गाजवले.
Full News
Share:

IPL 2026, GT vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना सुरू आहे.या सामन्यात पहिला डाव गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी गाजवला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या पंजाब किंग्सला त्यांनी दीडशे धावांसाठीही संघर्ष करायला लावला. तरी पंजाबसाठी सुर्यांश शेडगे आणि मार्कस स्टॉयनिस यांनी दिलेल्या लढाईमुळे गुजरातसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवता आले.या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी तरी योग्य ठरवला. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण मोहम्मद सिराजने टाकलेले पहिलेच षटक नाट्यपूर्ण ठरले. पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्यचा झेल सुटला. पण दुसऱ्याच चेंडूवर त्याचा अफलातून झेल निशांत सिंधूने घेतला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कूपर कोनोली शून्यावर बाद झाला.पण यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ६ व्या षटकात प्रभसिमरनलाही कागिसो रबाडाने १५ धावांवर माघारी धाडले. पुढच्याच षटकात नेहल वढेराला जेसन होल्डरने बाद केले, तर ९ व्या षटकात श्रेयस अय्यरलाही १९ धावांवर होल्डरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे ४७ धावांवर ५ विकेट्स अशी पंजाबची अवस्था झाली होती.परंतु, नंतर सुर्यांश शेडगेला मार्कस स्टॉयनिसची साथ मिळाली. या दोघांनी आक्रमक खेळण्यासोबत संघाला १२० धावांचा टप्पा १६ व्या षटकापर्यंत पार करून दिला. यादरमन्यात सुर्यांशने पहिले आयपीएल अर्धशतकही केले. पण त्याचा मोठा अडथळा १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने दूर केला. त्याचा झेल जॉस बटलरने घेतला. सुर्यांशने २९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५७ धावा करताना स्टॉयनिससोबत ७९ धावांची भागीदारीही केली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आयपीएल 2026 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व गाजवले. | Achira News