IPL 2026 DC vs CSK : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरदिल्ली कॅपिटल्सआणिचेन्नई सुपर किंग्सप्लेऑफ्सच्या शर्यतीत आगेकूच करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! DC ला मोठा दिलासा, CSK दोन बदलासह उतरला मैदानात दिल्ली कॅपिटल्सला यासामन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दुखापतीतून सावरून लुंगी एनिग्डी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कायले जेमिसनच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूलाचेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषसह दोन बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अकिल होसीन आणि गुरजपनीत सिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कमबॅकची संधी दिली आहे. २७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं दिल्ली पराभवाची परतफेड करणार? यंदाच्या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या २३ धावांनी पराभूत केले होते. घरच्या मैदानात या पराभवाची परतफेड करत दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवॉल्ड ब्रेविस, जेमी ओवर्टन, अकिल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत. दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (यष्टीरक्षक, पथुम निसंका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनिग्डी, टी नटराजन.
आयपीएल 2026: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज-प्लेऑफ बर्थच्या शोधात निर्णायक सामना
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.