Achira News Logo
Achira News

आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय

Maharashtra Times
आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय
Full News
Share:

हैदराबाद:आयपीएल 2026 च्या 45 व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला, परंतु हैदराबादला घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे सनरायझर्स हैदराबादची सलग पाच सामन्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने विजयांची हॅटट्रिक नोंदवली. मागील सहा सामन्यांमध्ये विजयाविना असलेला केकेआर जोरदार पुनरागमन करत आहे.या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संपूर्ण डावात त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. संघ 19 षटकांत 165 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मा केवळ 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने आक्रमक खेळी करत 28 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. इशान किशनसोबत मिळून त्याने संघाची धावसंख्या केवळ 8.5 षटकांत 105 पर्यंत पोहोचवली. पण त्यानंतर डाव पूर्णपणे कोलमडला.संघाने आपल्या शेवटच्या नऊ विकेट्स केवळ 60 धावांत गमावल्या, ज्यामुळे हैदराबादला केवळ 165 धावांवर समाधान मानावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने दमदार सुरुवात केली. फिन ॲलनने 13 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या, पण तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी सावध खेळ करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. रहाणेने 36 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या, तर अंगक्रिश रघुवंशीने 47 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. रिंकू सिंगनेही 11 चेंडूंमध्ये नाबाद 22 धावा केल्या, ज्यामुळे केकेआरने 18.2 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.कोलकाता नाईट रायडर्सचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादला 10 सामन्यांमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. असे असूनही, ते गुणतालिकेत पहिल्या तीन स्थानांवर कायम आहेत, तर केकेआर आठव्या स्थानावर आहे.या विजयाने कोलकत्ताला दिलासा मिळाला आहे. पण आता डबल हेडरमध्ये पुढचा सामना हा गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये असणार आहे. या सामन्यात पंजाब जिंकली तर कोलकत्ताच टेन्शन वाढणार आहे. पंजाब जिंकली तर त्यांचे गुण 15 होणार आहे,त्यामुळे जवळ जवळ ते क्वालिफाय होतील. पण जर आज निकाल फिरला आणि गुजरात जिंकली तर कोलकत्ताला दिलासा मिळेल. कारण गुजरात जिंकल्याने फारसा फरक पडणार नाही कारण चार क्रमांकाच्या खालच्या सगळ्याच संघाना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असणार.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय | Achira News