IPL 2026, KKR Seven Wicket Win Over SRH :कोलकाता नाईट रायडर्सच्यासंघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्यासनरायझर्स हैदराबादचा७ विकेट्सनी धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयासह प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनसह जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीसमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना तगडी फलंदाजी असलेलासनरायझर्स हैदराबादचासंघ १६५ धावांत गारद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकरअजिंक्य रहाणेआणि अंगकृष रघुवंशीच्या हिट शोनंतर रिंकूच्या फिनिशिंग टचसहकोलकाता नाईट रायडर्सनेविजय निश्चित केला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! ट्रॅविस हेडसह ईशान किशनची शानदार खेळी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण संघाच्या धावफलकावर ४४ धावा असताना चौथ्या षटकात कार्तिक त्यागीनं अभिषेक शर्माच्या खेळीला १५ धावांवरच ब्रेक लावला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ईशान किशन याने ट्रॅविस हेडसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत नेले. ट्रॅविस हेड २८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी करून वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसला. सुनील नरेन याने ईशान किशनला ४२ धावांवर तंबूतचा रस्ता दाखवला. त्यानंतर SRH च्या एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी सनरायझर्स हैदराबादचा संघ १९ षटकात १६५ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक ३ तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय अनुकूल रॉय, वैभव अरोरा आणि कॅमरून ग्रीन यानी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज मुंबईकर रहाणेसह रघुवंशीचा जलवा अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधारअजिंक्य रहाणेआणि फिन ॲलन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीनं पहिल्या ४ षटकात ४९ धावांची भागीदारी रचली. फिन ॲलन १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अंगकृष रघुवंशी याने कर्णधाराच्या साथीनं ६६ चेंडूत ८४ धावांची भागीदारी रचत डाव सेट केला. रघुवंशीनं ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. रिंकू सिंह २२ (११) आणि कॅमरून ग्रीन यांनी ३ (२) संघाला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
आयपीएल 2026 मध्ये नाईट रायडर्सने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या, एस. आर. एच. वर सात गडी राखून के. के. आर. चा विजय
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.