IPL 2026 Punjab Kings Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अनेक खेळाडू मोठमोठे शॉट्स खेळताना दिसत आहेत, यामध्ये पंजाब किंग्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्यचाही समावेश आहे.प्रियांश यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये अनेक आक्रमक खेळताना दिसतोय. मात्र काही दिवासांपूर्वीच त्याच्या मोठ्या षटकाराने एका जेष्ठ नागरीकाला दुखापत झाली होती. यानंतर मात्र प्रियांश आणि पंजाब किंग्सची संघमालकिन प्रीती झिंटाने झेट त्यांच्याशी संपर्क साधला आहे.झाले असे की लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या सामन्यात प्रियांश आर्य आक्रमक खेळत होता. त्यावेळी त्याने मारलेला षटकाराचा चेंडू स्टँडमध्ये गेला आणि तिथे बसलेल्या ज्येष्ठ नागरिक कृष्णन चंद यांच्या चेहऱ्यावर लागला. त्यामुळ रक्तही यायला लागलं. त्यामुळे त्यांच्या आजुबाजूच्या लोकांनी त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांना भुवयांजवळ टाकेही घालावे लागले.दरम्यान, त्यांना झालेल्या दुखापतीबाबत समजताच प्रियांश आर्य आणि प्रीती झिंटा यांनी चंद यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांच्या दुखापतीबाबत चौकशी केली. प्रियांश आणि प्रीती हे दोघेही चंद यांच्याशी झुम व्हिडिओ कॉल द्वारे चर्चा केली.प्रियांश चंद यांना म्हणाला, 'मी व्हिडिओ पाहिला आणि मला काळजी वाटली की ही मोठी दुखापत तर नाही ना?' त्यानंतर प्रीती झिंटानेही काळजी व्यक्त केली आणि दोघांनीही त्यांना लवरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रियांशने चंद यांना पंजाब किंग्सचा पुढचा सामना धरमशाला येथे पाहायला येण्याची विनंतीही केली.
आयपीएल 2026 मध्ये प्रियांश आर्यच्या'बिग सिक्स'ने ज्येष्ठ नागरिकांना दुखावले
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.