Achira News Logo
Achira News

आयपीएल 2026: रामकृष्ण घोष दुखापतीमुळे संघाबाहेर, सीएसकेला मोठा धक्का

Lokmat
आयपीएल 2026: रामकृष्ण घोष दुखापतीमुळे संघाबाहेर, सीएसकेला मोठा धक्का
Full News
Share:

IPL 2026 Big Blow For CSK Ramakrishna Ghosh Ruled Out Of IPL 2026 :आयपीएल २०२६स्पर्धेत दुखापतीच्या धक्क्यातून सावरत ट्रॅकवर आलेल्याचेन्नई सुपर किंग्सलाआणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे सरकत असताना चेन्नईच्या ताफ्यात MI विरुद्ध पदार्पणात चमकेलेल्या युवा गोलंदाजावर उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. CSK च्या संघाचा उदयोन्मुख ऑलराउंडर रामकृष्ण घोष दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार आहे.चेन्नई सुपर किंग्सच्यासंघाने अधिकृत निवेदन जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! नेमकं काय झालं? OFFICIAL ANNOUNCEMENT:Ramakrishna Ghosh sustained a fracture to his right foot during the CSK v MI match at Chepauk.He will take no further part in IPL 2026.Get well soon, Rambo.pic.twitter.com/CQve4zLixG चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत निवेदनानुसार, रामकृष्ण घोषच्या उजव्या पायला फ्रॅक्चर झाले आहे. ही दुखापत त्याला २ मे रोजीमुंबई इंडियन्सविरुद्धचेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे तो आता उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील MI विरुद्ध पदार्पणात धमक दाखवली, पण... नाशिकमध्ये जन्मलेला २८ वर्षीय क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो.मुंबई इंडियन्सविरुद्धच्यापदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासह सूर्यकुमार यादवची महत्त्वपूर्ण विकेट मिळवत त्याने दमदार पदार्पण केले. पण हाच सामना त्याच्यासाठी या हंगामातील शेवटचा सामना ठरला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी रामकृष्ण घोष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो. मागील वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेत इतिहास रचला होता. त्या सामन्यात त्याने ९.४ षटकांत ४२ धावा खर्च करत त्याने ७ विकेट्सचा डाव साधला होता. याशिवाय मुंबईविरुद्ध २७ चेंडूत ६४ धावांची स्फोटक खेळी करत त्याने फलंदाजीतील धमकही दाखवली होती. CSK साठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचे आहे. या परिस्थितीत उपयुक्त खेळाडू संघाबाहेर झाल्यामुळे येलो आर्मीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. CSK च्या ताफ्यात दुखापतीचं 'ग्रहण' यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. आधी नॅथन एलिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाज खलील अहमदही दुखापतीमुळे बाहेर पडला. फलंदाजीत आयुष म्हात्रेच्या रुपात संघाला मोठा धक्का बसला होता. त्यात आता रामकृष्ण घोषच्या नावाची भर पडली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

आयपीएल 2026: रामकृष्ण घोष दुखापतीमुळे संघाबाहेर, सीएसकेला मोठा धक्का | Achira News