मुंबई :रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघावर सहा विकेट आणि आठ चेंडू राखून मात केली. 'लखनौ'ने ५ बाद २२८ धावा केल्या होत्या. 'मुंबई'ने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. घरच्या मैदानावरील मागील सलग चार लढतीतील पराभवानंतर 'मुंबई' ने विजय मिळवला. हा सामना नेमका कुठे फिरला हे कॅप्टन ऋषभ पंत याने सांगितले आहे.नक्कीच काही धावा कमी पडल्या. कारण आम्ही जशी सुरूवात केली होती ते पाहून मला वाटतं अजून धावा व्हायला पाहिजे होत्या. सगळेजण मोकळेपणाने खेळले, पण शेवटी त्यांनी चांगली बॉलिंग केली.मुंबई इंडियन्सलाअशा परिस्थितीची सवय आहे. आम्ही १० ते १५ धावांनी कमी पडलो. कारण या पिचवर २३० धावा होणार होत्या. आम्हाला आणखी मेहनत करण्याची गरज आहे, असंऋषभ पंतम्हणाला.MI vs LSG: 'रोहित-रिकल्टन तर आहेच पण आणखी एक मॅचविनर ज्याने मॅच जिंकवली' विजयानंतर सूर्याकडून आर्वजून उल्लेखलखनौने पहिल्या सहा ओव्हरमध्ये ९०-१ धावा, ७ ते १६ ओव्हरमध्ये १०२-४ धावा केल्या होत्या पण शेवटच्या १७ ते २० ओव्हरमध्ये म्हणजेच २४ चेंडूत ११ धावाच करत आल्या. इथेच सामना फिरला, चांगल्या सुरूवातीनंतर लखनौ २५० धावांचा टप्पा पार करेल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही.MI vs LSG: मुंबईचा राजा आला अन् पलटण जिंकली; रो'हिट' खेळीच्या जीवावर वानखेडेत दमदार विजयलक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी पॉवरप्लेमधील पहिल्या सहा षटकांत बिनबाद ७१ अशी आश्वासक सुरुवात केली. या जोडीने १०.५ षटकांत १४३ धावांची सलामी दिली. याच मैदानावर यंदाच्या मोसमात 'वानखेडे' वर रोहित-रिकल्टनने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १४८ धावांची सलामी दिली होती. या जोडीने तिसऱ्यांदा शंभरहून अधिक धावांची भागीदारी रचली. रिकल्टनने २२ चेंडूंत, तर रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले मात्र दोघांनाही शतक पूर्ण करता आले नाही. तिलक वर्माही पाठोपाठ परतला. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. नमन धीर आणि विल जॅक्सने १९व्या षटकात विजय मिळवला.
आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर सहा गडी राखून विजय
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.