Achira News Logo
Achira News

इंडिगो विमानाच्या पॉवर बँकेला आग, प्रवाशांची सुखरूप सुटका

Lokmat
इंडिगो विमानाच्या पॉवर बँकेला आग, प्रवाशांची सुखरूप सुटका
Full News
Share:

Power Bank Catches Fire On IndiGo Flight:हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्याइंडिगोच्याविमानात मंगळवारी दुपारी लँडिंगनंतर अचानक धूर पसरल्याने एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यामुळे हीआगलागली असून, सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन स्लाइडद्वारे सर्व १९८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नेमकी घटना काय? मंगळवारी दुपारी साधारण ३.२९ वाजता हे विमान चंदीगड आंतरराष्ट्रीयविमानतळावरउतरले. विमान टॅक्सी वेवरून पार्किंग बे कडे जात असतानाच एका प्रवाशाच्या सीट पॉकेटमधील पाऊचमध्ये असलेल्या पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला. या घटनेनंतर विमानाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. विमान कर्मचाऱ्यांची तत्परता विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन अग्निशमन बाटल्यांचा वापर करूनआगविझवली. धूर पसरल्यामुळे तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला आणि विमानाचे सर्व सहा आपत्कालीन दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एका प्रवाशाला इजा आपत्कालीन स्लाइडवरून खाली उतरताना एका महिला प्रवाशाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. तिला तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून उर्वरित सर्व १९८ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे. DGCA आणिइंडिगोचेस्पष्टीकरण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर बँक सीट पॉकेटमध्ये असतानाच पेटली होती. इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, "५ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलवर नेण्यात आले आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हे विमान पुन्हा सेवेत येण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी केली जाईल".

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इंडिगो विमानाच्या पॉवर बँकेला आग, प्रवाशांची सुखरूप सुटका | Achira News