इराणवरून मोदी सरकारवर नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही गोष्टी राहून गेल्या. जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता. काश्मिरच्या मुददयावर आपल्याला पाठिंबा देत आला, त्याच्या अडचणीच्या काळात आपण उभे राहिलो नाही. इराणवर आज हल्ले होत आहेत, आपण इराणला साथ दयायला पाहिजे होती. देशात येणारे बरेचसे तेल इराणमधून येत होते. ते आपल्याला रूपयात तेल देत आले. पण खामेनी गेल्यानंतरही पंतप्रधानांनी निषेधाचे एक वक्तव्य केले नाही, हल्ल्यावरही काही बोलले नाही. त्याचा त्रास भविष्यात आपल्याला होणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आपल्याकडे स्वदेशीचे तुणतुणे वाजवले जाते. पण ज्यावर देश चालतो ते तेलपण बाहेरून येते. बाहेरून पैसे आणण्यापेक्षा बाहेरचे मेंदू आणा, असेही राज म्हणाले.
इराण हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल भारतीय राजकारण्याने केली पंतप्रधान मोदींवर टीका
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.