Achira News Logo
Achira News

इराणच्या ऊर्जा हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणावात तेलाच्या किंमती वाढल्या

Lokmat
इराणच्या ऊर्जा हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणावात तेलाच्या किंमती वाढल्या
Full News
Share:

दुबई :इराणनेसौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांवर गुरुवारी केलेल्या हल्ल्यांमुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू दरात मोठी उसळी आली आहे. इस्रायलने एक दिवस आधीइराणच्या‘साउथ पार्स’ वायू क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ११८ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या असून, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्यायुद्धानंतरत्या ६० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक होते; मात्र इराणच्या कारवायांमुळे हा मार्ग जवळपास अडथळाग्रस्त झाला आहे. यूएईतील ‘अल धाफ्रा’ हवाई तळावर इराणी हल्ल्यांमुळे नुकसान झाल्याचे उपग्रह चित्रांवरून स्पष्ट झाले आहे. येथे सुमारे २,००० अमेरिकन सैनिक तैनात होते. ‘शेल’कडून नुकसानीचे मूल्यांकन ऊर्जा कंपनी शेलने कतारमधील रास लाफान औद्योगिक क्षेत्रातील ‘पर्ल जीटीएल’ प्रकल्पाच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू केल्याचे सांगितले. या हल्ल्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली असून, कतार एनर्जी सोबत समन्वय साधून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. हवाई वाहतूक आणि लष्करी घडामोडीहाँगकाँगस्थित कॅथे पॅसिफिक एअरलाइनने दुबई आणि रियाधसाठीच्या उड्डाणे एप्रिलअखेरपर्यंत स्थगित केली आहेत. संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आखाती मार्ग टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तेलसाठ्यांवर हल्ल्याने युरोप चिंतेतफ्रान्सने या संघर्षाला बेजबाबदार म्हणत रमजान महिन्याच्या अखेरीसयुद्धविरामाचेआवाहन केले.जर्मनीने कोणत्याही लष्करी मोहिमेत सहभागी होणार नाही. हल्ले थांबवल्यास मदत करू शकतो, असे म्हटले.ऑस्ट्रियाने युरोपला या युद्धात ओढू युरोपला ब्लॅकमेल करता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.अरब लीगने या हल्ल्यांनी तेलदरात होणारी वाढ धोकादायक आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसेल. चीनने आंतरराष्ट्रीय संबंधांत बळाचा वापर करू नका. हा संघर्ष तत्काळ थांबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, असे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाने इराणचे असे प्रत्युत्तरात्मक हल्ले बेजबाबदार आहे. त्यांनी युद्ध पेटवू नये, असे म्हटले. ‘इराणची सर्व पाणबुडी क्षमता निष्प्रभ’वॉशिंग्टन : इराणची नौदल क्षमता मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ झाली असून, त्यांच्या सर्व ११ पाणबुड्या नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेगसेथ यांनी केला. पीटर हेगसेथ यांनी उल्लेख केलेल्या इराणच्या पाणबुड्या या लहान आकाराच्या (मिजेट) असून, त्या आखातातील उथळ समुद्री प्रदेशात चालवल्या जातात. पर्शियाचे आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अरुंद समुद्री मार्गांमध्ये या पाणबुड्यांमार्फत सहज लपून पाण सुरुंग पेरणे आणि टॉरपिडो हल्ले करणे शक्य होते. या युद्धात अमेरिकेचे सैन्य निर्णायक टप्प्यात आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इराणच्या ऊर्जा हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणावात तेलाच्या किंमती वाढल्या | Achira News