Achira News Logo
Achira News

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबाबत आखाती आणि मुस्लिम देशांचा इशारा

Maharashtra Times
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबाबत आखाती आणि मुस्लिम देशांचा इशारा
Full News
Share:

रियाध: इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करत आखाती देशांवर जोरदार हल्ले सुरु ठेवले आहेत. यानंतर आत आखाती देशांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आखाती आणि मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची रियाधमध्ये एक बैठक पार पडली. इराणकडून सातत्यानं होत असलेले हल्ले, मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अझरबैझान, बहारिन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, तुर्की, सीरिया, यूएईचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.इराणनं त्यांच्याकडून सुरु असलेले हल्ले तात्काळ थांबवावेत, असं आवाहन १२ मुस्लिम देशांकडून करण्यात आलं आहे. इराणनं सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव २८१७ (२०२६) चं पालन करावं, यावर इराणनं जोर दिला. इराणनं हल्ले थांबवावेत, शेजारी देशांवरील कारवाया थांबवाव्यात, दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊ नये, अर्थ पुरवठा करु नये, अशा मागण्या मुस्लिम देशांनी केल्या आहेत.इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक सुरळीत करावी, त्यात कोणतेही अडथळे आणू नयेत, बाब अल-मंदाबची सुरक्षा धोक्यात घालू नये, असं मुस्लिम देशांनी एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे. यावेळी मु्स्लिम देशांच्या मंत्र्यांनी आखात सहकार्य परिषदेच्या देशांवर इराणकडून झालेल्या हल्ल्यांबद्दल चर्चा केली.बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचा वापर करुन इराण आखाती देशांवर सातत्यानं हल्ले करत आहे. या हल्ल्यांचा मुस्लिम देशांकडून निषेध करण्यात आला. इराणनं सुरुवातीला आखाती देशांमधील अमेरिकेच्या हवाई आणि नौदल तळांना लक्ष्य केलं. मात्र आता इराण आखाती देशांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करत आहे. खनिज तेलाचे शु्द्धीकरण प्रकल्प, गॅस प्रकल्प इराणकडून लक्ष्य करण्यात आले आहेत. यामुळे आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.आखातामधील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर अलवंबून आहे. पण गेल्या १५ दिवसांपासून या देशांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. इराणनं ऊर्जा प्रकल्पांवर केलेले हल्ले, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीची केलेली कोंडी यामुळे आखाती देशांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबाबत आखाती आणि मुस्लिम देशांचा इशारा | Achira News