Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi:अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कूटनीतीने उत्तर देत, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने अनेक देशांमध्ये इंधन-ऊर्जासंकट निर्माण झालं आहे. याची गंभीर दखल घेऊन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा देश एकत्र आले असून त्यांनी इराणला तंबी दिली आहे. युद्धाच्या झळा कमी होण्याची चिन्हं नसताना, इस्रायलने अमेरिकेला युद्धात ओढल्याचा दावाबेंजामिन नेतन्याहूयांनी फेटाळून लावला आहे. या युद्धामुळे भारतात निर्माण झालेली एलपीजी टंचाई आणि गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र, व्यावसायिकांना सिलिंडरसाठी अजूनही आटापिटा करावा लागतोय. महाराष्ट्रात अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातराज ठाकरेयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही टीकेचं लक्ष्य केल्यानं मनसे विरुद्ध भाजपा असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. युद्ध आणि अमेरिकेतील अर्थकारण यामुळे कोसळलेला शेअर बाजार पुन्हा कधी आणि कसा सावरणार, याची काळजी गुंतवणूकरादांना आहे. दुसरीकडे, आयपीएलचे वारे वाहू लागले असून क्रिकेटचाहत्यांना रनसंग्रामाचे वेध लागले आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. "सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
इराणच्या होरमुझ सामुद्रधुनीवर सहा देशांनी केलेल्या नाकाबंदीमुळे जागतिक इंधन-ऊर्जा संकट चिघळले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.