America Israel Iran War:अमेरिकाइस्रायलआणिइराणयांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला असून, अनेक बाबतीत नुकसान सोसावे लागत आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत अनेक दावे केले आहेत. पंरतु, त्यापैकी बहुतांश दावे फोल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनीइराणयुद्धात विजय मिळवल्याचा दावा करत इराणचे नेतृत्व आता संपले असल्याचा दावा केला होता.इस्रायलचेपंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही युद्धात विजय मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आता कोणतीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता शिल्लक राहिलेली नाही, असेही म्हटले होते. यातच क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता नष्ट केल्याच्याअमेरिकाआणि इस्रायलच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा इशारा दिला आहे. क्षेपणास्त्रांची कोणतीही कमतरता नाही इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, युद्धाच्या काळातही क्षेपणास्त्रांचे उत्पादन अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होत आहे. याकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, इस्रायलने इराणच्या पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारपासून बहरीनपर्यंतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर प्रतिहल्ले केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या गॅस क्षेत्रावरील हल्ल्याची माहिती नसल्याचे सांगत, नेतान्याहू यांना याची पुनरावृत्ती न करण्याचे आवाहन केले होते.
इराणसोबतचा अमेरिका-इस्रायल संघर्ष अविरत सुरूः जागतिक परिणाम आणि खोटे दावे
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.