Achira News Logo
Achira News

इशान किशनच्या शतकी खेळीमुळे भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Loksatta
इशान किशनच्या शतकी खेळीमुळे भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
Full News
Share:

Ishan Kishan on POTM Award and His Comeback:इशान किशनने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात शतक झळकावलं. त्याच्या या शतकी खेळीने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. इशान किशनने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिलं टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. संघात बऱ्याच काळानंतर पुनरागमन केल्यानंतर ही शतकी खेळी केल्यानंतरही तो समाधानी नसल्याचं त्याने सांगितलं. इशानने अवघ्या ४३ चेंडूत १०३ धावांची आक्रमक खेळी करताना त्याने ६ चौकार आणि १० षटकार लगावले. केवळ ४२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं आणि भारताला २० षटकांत ५ बाद २७१ धावांचा भक्कम स्कोअर उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसह १३७ धावांची भागीदारीही रचली. इशानला त्याच्या या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताने हा सामना ४६ धावांनी जिंकल्यानंतर, किशनला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघात झालेलं हे प्रभावी पुनरागमन, शतक आणि अवॉर्ड्स या सध्याच्या यशापेक्षा २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकणं हेच त्याचं अंतिम ध्येय आहे. इशान किशन सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला, “तसं समाधान वाटतंय, पण तरीही मला असं वाटतं की मी अजून माझ्या अपेक्षित स्तरावर पोहोचलो नाही. मी चांगली कामगिरी केली आहे, पुरस्कारही मिळाले आहेत, पण माझं मुख्य लक्ष विश्वचषकावर आहे. तिथेच अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या मिळालेला फॉर्म पुढेही कायम ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे,” असं किशनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितलं. शतकाच्या उंबरठ्यावर असताना गती कमी का केली नाही, असा प्रश्न किशनला विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट केलं की वैयक्तिक विक्रमांचा पाठलाग न करता, योग्य चेंडू मिळताच मोठे फटके मारणं हीच संघाची भूमिका आहे. “आजकाल आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूची हीच रणनिती आहे. तुम्ही विक्रमाच्या अगदी जवळ असलात तरी त्याला फारसं महत्त्व नसतं. त्या षटकांत जर तुम्ही सिंगल्स काढत बसलात, तर नंतर असं वाटतं की आपण आणखी मोठी खेळी साकारू शकलो असतो आणि त्यामुळे फरक खूप मोठा पडतो. चेंडू मोठा फटका खेळण्याजोगा असेल, तर तो मैदानाबाहेर पाठवायलाच हवा,” असं किशन म्हणाला. ईशान किशनसाठी या मालिकेची सुरूवात फारशी चांगली नव्हती. दोन वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करताना पहिल्या टी-२० सामन्यात तो केवळ ८ धावा करत बाद झाला. मात्र, त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात मॅचविनिंग ३२ चेंडूत ७६ धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने २०९ धावांचं लक्ष्य अवघ्या १५.२ षटकांत गाठलं.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इशान किशनच्या शतकी खेळीमुळे भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय | Achira News