Achira News Logo
Achira News

इष्टतम आरोग्यासाठी पानांच्या लपलेल्या गुणांना उघडे करणे

Maharashtra Times
इष्टतम आरोग्यासाठी पानांच्या लपलेल्या गुणांना उघडे करणे
Full News
Share:

डिनरनंतर किंवा सणासुदीच्या वेळी पान खाण्याची सवय आपल्या घराघरात आजही दिसते. हिरवं, चमकदार आणि सुगंधी पान केवळ मुखशुद्धी म्हणूनच नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे उपयोगी ठरतं. पण आपण बहुतेक वेळा त्याकडे केवळ परंपरेचा भाग म्हणून पाहतो. खरं तर या छोट्याशा पानात शरीराला तंदुरुस्त ठेवणारे गुण लपलेले आहेत. आपल्या पूर्वजांनी जे पानाच्या सेवनाचं महत्त्व सांगितलं, ते केवळ परंपरेपुरतं नव्हतं, त्यामागे वैद्यकीय कारणंही होती.भारतातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेर यांच्या मते, जर पानाचं सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केलं, तर आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. चला, जाणून घेऊ या या साध्या पण प्रभावी पानाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी.पचनशक्ती वाढवणारं नैसर्गिक औषधजेवणानंतर पान खाण्याची परंपरा काही उगीच नाही. पानातील नैसर्गिक घटक पचनसंस्थेचं कार्य सुरळीत ठेवतात. हे अन्न लवकर पचायला मदत करतं,पोटफुगी, आम्लपित्त किंवा गॅसयांसारख्या त्रासांपासून आराम मिळवून देतं. पान खाल्ल्यानं लाळेचं स्राव वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते. जे लोक वारंवार अजीर्ण किंवा जडपणाचा त्रास अनुभवतात, त्यांनी पानाचं सेवन केल्यानं फरक जाणवू शकतो.श्वसनाच्या तक्रारींवर दिलासाहवामानातील बदलामुळे अनेकांनासर्दी, खोकला, दम्यासारख्या समस्यावाढतात. पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण श्वसनसंस्थेतील सूज कमी करण्यात मदत करतात. गरम पाण्यात पान उकळून त्याचा वाफेचा श्वास घेतल्यास कफ ढिला होतो आणि श्वास घेणं सोपं होतं. अशा प्रकारे पान हे घरगुती औषधासारखं उपयोगी ठरतं.कॅन्सरपासून बचाव करणारे घटक​पानामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सअसतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. हेच फ्री रॅडिकल्स दीर्घकाळात पेशींना नुकसान पोहोचवतात आणि कॅन्सरचा धोका वाढवतात. त्यामुळे पानाचं नियमित सेवन शरीराला या हानीकारक घटकांपासून संरक्षण देतं. याशिवाय पानामधील फाइटोन्युट्रिएंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.मन शांत करणारा प्रभावआपल्याला थकवा, चिडचिड किंवा उदासीनता जाणवली तर पानाचं सेवन मेंदूला शांतता आणि ताजेपणा देतं. पानामधील काही नैसर्गिक रसायनं मेंदूत ‘एसीटिलकोलाइन’ नावाचं तत्व संतुलित ठेवतात, जे मूड सुधारण्यास मदत करतं. त्यामुळे हलक्या स्वरूपाच्या डिप्रेशनमध्येही हे उपयुक्त ठरतं. म्हणूनच आपल्या आजीआजोबा जेवणानंतर हसत पानाचा तुकडा घेत, त्यामागं एक मानसिक शांतीही दडलेली होती.तोंड आणि शरीराचं रक्षणपानाचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण शरीरातील सूक्ष्मजंतूंना नष्ट करतात. त्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि हिरड्यांची सूजही कमी होते. याशिवाय हे जंतुनाशक म्हणून कार्य करत असल्याने संसर्गांपासून शरीराचं रक्षण करतं. पानाचं चहात उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दीखोकल्यापासून बचाव होतो.कसं खावं हे पान?पानाचं सेवन नेहमी नैसर्गिक आणि संतुलित पद्धतीने करावं. चूना, कत्था किंवा सुपारी टाळावी, कारण ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. शुद्ध हिरवं पान जेवणानंतर खाणं किंवा पानाचा काढा करून पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंपरेत लपलेलं हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात परत आणलं, तर लहानशा सवयीमुळेही मोठं आरोग्य लाभू शकतं.टिप :हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी MT घेत नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इष्टतम आरोग्यासाठी पानांच्या लपलेल्या गुणांना उघडे करणे | Achira News