Achira News Logo
Achira News

इस्रायलने एकट्यानेच युद्ध पुकारले, नेतान्याहू यांचा दावा फेटाळला

Lokmat
इस्रायलने एकट्यानेच युद्ध पुकारले, नेतान्याहू यांचा दावा फेटाळला
Full News
Share:

इस्रायलनेचअमेरिकेलाइराणविरूद्धच्यायुद्धातओढले, अशी चर्चा संघर्ष सुरू झाल्यापासून होत आहे. याबद्दल बोलतानाइस्रायलचेपंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. आम्ही अमेरिकेला यायुद्धातजबरदस्ती ओढलेले नाही, असे ते म्हणाले. इराणच्यासाउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नेतन्याहू म्हणाले की, "खरंच कुणाच्या मनात असा विचार येईल का की आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारू की, काय करायला हवे?" इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना आधी दिली गेली होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर नेतन्याहू म्हणाले की, 'इस्रायलने एकट्याने ही कारवाई केली आहे. ट्रम्प यांनी आम्हाला यापुढे हल्ले करण्यापासून रोखले आहे आणि आम्ही तसेच करत आहोत.' ट्रम्प यांनीही चर्चा फेटाळली २८ फेब्रुवारी रोजी इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाची ठिणगी पडली. याच दिवशी इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू होती. त्याच काळात अचानक इस्रायल, अमेरिकेने युद्ध सुरू केले. अमेरिकेनेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही असा प्रश्न विचारला गेला होता की, अमेरिकेला इस्रायलने बळजबरी युद्धात ओढले. त्यावर त्यांनी नकार दिला. ते सातत्याने असे काही झाले नसल्याचेच म्हणत आहे. "कदाचित असेही झाले असावे की, मी त्यांना (इस्रायल) युद्धात सामील होण्यासाठी मजबूर केले. बघा, आम्ही मुर्खांसोबत (इराण) चर्चा करत होतो, आणि माझे असे मत आहे की, ते (इराण) आधी हल्ला करणार होते", असे ट्रम्प व्हाईट हाउसमध्ये मार्चच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. केंट यांच्या राजीनाम्याने अमेरिकेच्या भूमिकेवर शंका अमेरिकेमध्ये या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे की, अमेरिका या युद्धात का सामील झाली आहे आणि यात इस्रायलची भूमिका काय आहे? अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चेला वेग आला आहे. केंट यांनी ट्रम्प यांना दिलेल्या राजीनाम्यामध्येच हे स्पष्ट आहे की आम्ही (अमेरिका) इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली लोकांच्या लॉबीने टाकलेल्या दबावामुळे सुरू केले आहे. त्यांनी एका मुलाखतीतही सांगितले की, इस्रायलने युद्धाचा निर्णय समोर मांडला. इस्रायली अधिकारी सर्व प्रक्रिया बाजूला सारून अमेरिकेच्या खासदारांचे युद्धासाठी मत परिवर्तन करत होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

इस्रायलने एकट्यानेच युद्ध पुकारले, नेतान्याहू यांचा दावा फेटाळला | Achira News