जितेंद्र खापरे, नागपूर :उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारचा मध्यप्रदेशातील ढाकना गावाजवळ भीषण अपघात होऊन कामठी आणि नागपूरातील मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामठी आणि नागपूर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये शुभम जयस्वाल (२८, रा. रनाळा, कामठी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अमन जयस्वाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे.कार पालटलीमिळालेल्या माहितीनुसार, अमन, जतिन, पारस आणि शुभम हे चौघेजण उज्जैनजवळील नलखेडा परिसरातील बगलामुखी मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे परतत होते. गुरुवारी सकाळी बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई परिसरात त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले.कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरप्राथमिक तपासात चालकाला झोपेचा झटका आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी (रा. कल्याणपूर, बैतूल) यांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. जखमी अमन जयस्वाल यांनी सांगितले की, “मी आणि शुभम मागील सीटवर झोपलो होतो, तर पारस गाडी चालवत होता.” त्यानंतर झालेल्या अपघातात शुभमचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी पारस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.Raj Thackeray : 'महाराष्ट्र नेक्स्ट' वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलंअमन यांचा हात फ्रॅक्चर झाला असून जतिनची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कामठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. शुभम जयस्वाल यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्याताब्यातदेण्यात आला आहे.तपास सुरुदरम्यान, या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून वाहनाचा वेग, चालकाची स्थिती आणि रस्त्याची परिस्थिती यांचा सखोलतपासकेला जात आहे.
उज्जैनमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.