Achira News Logo
Achira News

उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली

Lokmat
उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली
Full News
Share:

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटनाउत्तर प्रदेशमधीलमैनपुरी जिल्ह्यात घडली आहे. आरोपीची बहीण परजातीमधील तरुणासोबत पळून गेल्यावरून हे दाम्पत्य सारखे टोमणे मारायचे. त्याला वैतागून शेजारी राहणाऱ्या या तरुणाने एका नातेवाईकासोबत मिळून या दाम्पत्याची हत्या केली. तसेच त्यांच्या घरातील ऐवजाची लूट केली. या घटनेचा तातडीने तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले दागदागिने आणि दोन कट्टे जप्त केले आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फुलापूर गावातील महेश चंद्र आणि त्यांची पत्नी अनिता देवी या दाम्पत्याची २६ जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी घरात लुटालूट केल्याचंही दिसून आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिलं होतं. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली आणि आनंद आणि अर्जुन नावाच्या २ आरोपींना अटक केली. यापैकी आनंद हा मृत दाम्पत्याचा शेजारी तर अर्जुन हा त्यांचा चुलत जावई होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आनंद याची बहीण परजातीमधील एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यावरून शेजारी राहणारं हे दाम्पत्य ‘तुझी बहीण तर पळून गेली’, असे म्हणून सारखे टोमणे मारायचे. त्यामुळे आनंद हा वैतागलेला होता. त्याच रागातूनन आनंद याने मृत दाम्पत्याचा चुलत जावई असलेल्या अर्जुन याच्या मदतीने या दोघांचीही हत्या केली. मृत दाम्पत्याच्या घरी १८ फेब्रुवारीला मुलाचा लग्नसोहळा होता. त्यामुळे घरात दागदागिने असतील, याचा अंदाज बांधून आरोपींनी घरात लुटालूटही केली. खरंतर आरोपींना केवळ महेश चंद्र यांचीच हत्या करायची होती. मात्र गोळी झाडत असतानाच त्यांची पत्नी तिथे आल्याने आरोपींनी तिचीही हत्या केली. त्यानंतर आरोपी घरातील दागदागिने घेऊन पसार झाले. मात्र यादरम्यान, आरोपींची टॉर्च घटनास्थळी राहिली. या टॉर्चवरूनच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

उत्तर प्रदेशात जातीच्या पलायनावरून झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने शेजाऱ्यांची हत्या केली | Achira News