Achira News Logo
Achira News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची डी. जी. सी. ए. ची चौकशी

Lokmat
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची डी. जी. सी. ए. ची चौकशी
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: उपमुख्यमंत्रीअजित पवारयांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करणार आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे.अजित पवारयांना विमान पुरवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. या विशेष ऑडिट समितीमध्ये डीजीसीएचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आर.के. आनंद यांच्या नेतृत्वाखाली डीजीसीएच्या एअर सेफ्टी विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल पथिक वाघेला, एअरवर्दीनेस विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुशील मलिक, एअर सेफ्टी विभागाचे सहायक संचालक शिव कुमार जदाला आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवारयांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताची डी. जी. सी. ए. ची चौकशी | Achira News