Achira News Logo
Achira News

उष्णतेच्या लाटेत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Lokmat
उष्णतेच्या लाटेत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
Full News
Share:

Rain Orange Alert :उन्हाचे चटके जाणवत असताना राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे १८ मार्च रोजी म्हणजेच आजच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई वेधशाळेने केले आहे. मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्याहवामान अंदाजानुसारपुढील तीन तास महत्वाचे आहेत. या तीन तासांत राज्यातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यमपाऊसआणि ४०-५० किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासाठी अलर्टतसेच नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दि. १९ मार्च २०२६ रोजी (ऑरेंज अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ५०-६० किमी प्रतितास वेगासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच घाट प्रक्षेत्रात तुरळक ठिकाणी दि. १९ मार्च २०२६ रोजी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेगासह हलका ते मध्यमपाऊसहोण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी दिली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

उष्णतेच्या लाटेत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी | Achira News