Achira News Logo
Achira News

एक छप्पर संकुलः महामंडळ विभाग आणि सेवांसाठी एक केंद्र

Pudhari
एक छप्पर संकुलः महामंडळ विभाग आणि सेवांसाठी एक केंद्र
Full News
Share:

सर्व विभाग एका छताखाली येणार या ठिकाणी 6 ते 18 मजल्यांच्या चार इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला 3 तळघरे (बेसमेंट) आहे. येथे नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग््रांथालय, क्लिनिक, वाचनालय, प्रदर्शन हॉल, संग््राहालय, बहुउद्देशीय हॉल, भव्य सहभागृह, पत्रकार कक्ष असणार आहे. नगरसेवक संख्या वाढ लक्षात घेऊन भव्य सभागृह व दालने उभारण्यात आले आहे. चारचाकी 479 आणि दुचाकी 2 हजार 713 वाहने पार्क करता येईल, असे वाहनतळ असणार आहे. एकूण 16 लिफ्टची सुविधा असणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने ती नागरिकांसह, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कर ठरणार आहे. चिंचवड मेट्रो स्टेशनही जवळच असणार आहे. एकाच इमारतींमध्ये महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी बसू शकतील, अशी क्षमता आहे. सर्व विभागांचे कामकाज येथून चालणार असल्याने सर्व विभाग एका छताखाली येणार आहेत. विविध विभागांत एकूण 2 हजार 689 अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे. अजितदादांचा पुतळा सिटी सेंटरच्या जागेत नवीन महापालिका भवनासमोर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा असणार नाही, तर डी मार्टशेजारी असणाऱ्या खाणीच्या जागेत तो पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. पुतळ्याची उंची 22 मीटर इतकी असणार आहे. त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभीकरण केला जाणार आहे. तसेच कारंजे असणार आहेत. त्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या जागेत उभारण्यात येणारा सिटी सेंटर हा आंतराष्ट्रीय व्यापारी संकुल प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

एक छप्पर संकुलः महामंडळ विभाग आणि सेवांसाठी एक केंद्र | Achira News