NEET UG 2026 Cheating :गडचिरोलीत 'नीट' परीक्षेदरम्यान हायटेक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कडक तपासणी असतानाही दोन विद्यार्थ्यांनी चक्क मोबाइल परीक्षा केंद्रात नेले आणि 'AI' च्या मदतीने उत्तरे मिळवली. शिवाजी महाविद्यालय आणि गोकुळनगर केंद्रावरील या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी 'सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४' अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता रविवारी झालेल्या ‘नीट’ परीक्षेसाठी कडक तपासणी, बंदोबस्त आणि नियमांची जाळी असतानाही गडचिरोली येथील दोन केंद्रांवर विद्यार्थ्यांनी मोबाइल आत नेऊन एआयच्या मदतीने उत्तरे मिळवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.सुरक्षेला छेद कसा?‘नीट’सारख्या परीक्षेत अगदी चप्पल, पिना, दागिने यांनाही मनाई असताना मोबाइल आत कसा गेला, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे केंद्रावरील तपासणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या हातांच्या लेकरांनी गाठलं आभाळ! पुण्याच्या झोपडपट्टीतून उमलली बारावीच्या यशाची 'फुले'शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालय केंद्रावर दुपारच्या सत्रात खोली क्रमांक ६ मध्ये बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका विद्यार्थिनीच्या हालचालींनी पर्यवेक्षकांचे लक्ष वेधले. तपासणी केली असता तिच्याकडे लपवून ठेवलेला मोबाइल सापडला. एवढेच नाही, तर नवीन प्रश्नपत्रिका लपवून जुना पेपर जोडून कॉपी करण्याची योजना तिने आखल्याचे समोर आले.गोकुळनगर येथील दुसऱ्या केंद्रावर आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. आष्टी येथील १७ वर्षीय परीक्षार्थी मोबाइलसह परीक्षेला बसल्याचे आढळले. पर्यवेक्षकांनी त्याला पकडल्यानंतर मोबाइल तपासला असता, प्रश्नपत्रिकेचे फोटो आणि त्यावरून एआयकडून मिळवलेली उत्तरे स्पष्ट दिसली. चॅट हिस्ट्रीनेच ‘डिजिटल कॉपी’चा पर्दाफाश केला.Maharashtra Board Digital Exam Plan: कागद नाही, आता फक्त स्क्रीन! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार पेपरलेस! कधीपासून होणार अंमलबजावणी?या दोन्ही प्रकरणांत केंद्रप्रमुखांनी तक्रार दिल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. जप्त मोबाइल आणि संबंधित डिजिटल पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध सुरू आहे.
एन. ई. ई. टी. यू. जी. परीक्षेतील फसवणूक प्रकरणः उत्तरांची नक्कल करण्यासाठी विद्यार्थी ए. आय. द्वारे चालणारे फोन वापरतात
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.