Achira News Logo
Achira News

एलन मस्कने मुलाचे नाव नोबेल पारितोषिक विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नायक यांच्या नावावरून ठेवले

Pudhari
एलन मस्कने मुलाचे नाव नोबेल पारितोषिक विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नायक यांच्या नावावरून ठेवले
Full News
Share:

मस्क यांच्या मुलाच्या नावातील ‘सेखर’ हा भाग विशेष चर्चेत आहे. हे नाव प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना समर्पित आहे. चंद्रशेखर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. तार्‍यांची निर्मिती, रचना आणि आयुष्य यावर त्यांनी केलेले संशोधन विज्ञानाच्या इतिहासात मैलाचा दगड मानले जाते. तर ‘स्ट्रायडर’ हे नाव प्रसिद्ध ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीतील नायक अरागॉर्न (स्ट्रायडर) यावरून घेतले आहे. अशा प्रकारे मस्कने काल्पनिक साहित्य आणि वास्तवातील विज्ञान यांचा अनोखा संगम आपल्या मुलाच्या नावात केला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

एलन मस्कने मुलाचे नाव नोबेल पारितोषिक विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नायक यांच्या नावावरून ठेवले | Achira News