लंडन :वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी जगभरात नवनवीन प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, कार आणि सायकलचे उत्तम मिश्रण असलेली ‘एलेसी’ ( Elecy) नावाची एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल युरोपमध्ये विकसित करण्यात आली आहे. दिसायला एखाद्या छोट्या कारसारखी वाटणारी ही सायकल सध्या ऑटोमोबाईल विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य सायकलींना दोन चाके असतात; मात्र ‘एलेसी’ला चार चाके देण्यात आली आहेत. यामुळे सायकल चालवताना समतोल राखण्याची कसरत करावी लागत नाही. थांबल्यावर पाय खाली टेकवण्याचीही गरज पडत नाही, ज्यामुळे ती अत्यंत सुरक्षित आणि स्थिर मानली जाते.
एलिसीः विद्युत सायकलींमधील युरोपचा नवीनतम शोध प्रदूषण आणि गर्दी हाताळतो
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.