Achira News Logo
Achira News

एसआरएच विरुद्ध के. के. आर.: हैदराबादची फलंदाजी कोसळली, कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंचे वर्चस्व

Sakal
एसआरएच विरुद्ध के. के. आर.: हैदराबादची फलंदाजी कोसळली, कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंचे वर्चस्व
Full News
Share:

SRH vs KKR IPL 2026 Marathi News: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्यांच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना थक्क केलं होतं. मात्र रविवारी (३ मे) घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र त्यांची फलंदाजी ढेपाळल्याचे दिसले.कोलकाताच्या फिरकी गोलंजाजांच्या जाळ्यात हैदराबादचे फलंदाज अडकल्याचे दिसले. त्यामुळे हैदराबादने कोलकातासमोर १६६ धावांचेच लक्ष्य ठेवले. या सामन्यादरम्यान सुनील नरेनने (Sunil Narine) मोठा विक्रमही केला.या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात आक्रमक केली, पण अभिषेकला चौथ्याच षटकात कार्तिक त्यागीने १५ धावांवर बाद केले. पण तरी हेडला ईशान किशनची साथ मिळाली.हेड चांगल्या लयीत खेळत होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र हेड आणि ईशान यांची जोडी ९ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने तोडली. त्यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली होती. वरुणने हेडला कॅमेरॉन ग्रीनच्या हातून झेलबाद केले. हेडने २८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावा केल्या.या विकेटनंतर मात्र हैदराबादला कोलकाताच्या फिरकीने जखडून ठेवले. क्लासेनला आधी कॅमेरॉन ग्रीनने ११ धावांवर बाद केले. त्याचा एका हाताने अफलातून झेल रोवमन पॉवेलने घेतला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने स्मरण रवीचंद्रन (४) आणि अनिकेत वर्माला (६) स्वस्तात बाद केले.ONE-HANDED STUNNER! 🤯Rovman Powell loses his shades but keeps his hold on the ball 👏👏Is this your 𝘤𝘢𝘵𝘤𝘩 𝘰𝘧 𝘵𝘩𝘦 𝘴𝘦𝘢𝘴𝘰𝘯? 🤔Updates ▶️https://t.co/muersQO7at#TATAIPL|#KhelBindaas|#SRHvKKR|@Ravipowell26pic.twitter.com/xnOdjScT3e१६ व्या षटकात सुनील नरेनने सलील अरोराला २ धावांवर बाद केल्यानंतर ईशान किशनचा अडथळाही दूर केला. ईशान २९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला.A special delivery to reach a special milestone 🤌🎥 Sunil Narine picks his 200th#TATAIPLwicket with an unplayable delivery 🫡Updates ▶️https://t.co/muersQO7at#KhelBindaas|#SRHvKKR|@KKRiderspic.twitter.com/HTud7IBAq4नंतर पॅट कमिनस (१०), शिवांग कुमार (१) आणि हर्षल पटेल (६) हे देखील स्वस्तात बाद झाले. त्यामुळे हैदराबादचा संघ १९ षटकातच १६५ धावांवर सर्वबाद झाला.कोलताताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

एसआरएच विरुद्ध के. के. आर.: हैदराबादची फलंदाजी कोसळली, कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंचे वर्चस्व | Achira News