Achira News Logo
Achira News

ऐतिहासिक घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण

Lokmat
ऐतिहासिक घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण
Full News
Share:

Gold-Silver Price Today :गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक पडझडीनंतर, शुक्रवारी भारतीय सराफा बाजार आणि मौल्यवान धातूंशी संबंधित ईटीएफमध्ये जोरदार पुनरागमन पाहायला मिळाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे गुरुवारी ८ टक्क्यांपर्यंत कोसळलेल्या किमतींनी शुक्रवारी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.चांदीच्याभावात एकाच दिवसात ८,५०० रुपयांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली, तर सोन्याचे दरही ३ टक्क्यांनी सावरले आहेत. ईटीएफ मार्केटमध्ये तेजीचे पुनरागमनशुक्रवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्याम्युच्युअल फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांची मोठी खरेदी दिसून आली. MCX आणि जागतिक बाजारातील चित्रदेशांतर्गत वायदा बाजारात शुक्रवारी किमतींनी उसळी घेतली. गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा 'गुरुमंत्र'सध्याच्या अस्थिर वातावरणात घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.तज्ज्ञांच्या मते, किमतीत आलेली ही घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोने-चांदी हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचे साधन राहिले आहेत. बाजाराची 'टायमिंग' करण्यापेक्षा आपल्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीचे प्रमाण योग्य राखण्यावर भर द्यावा.मध्य आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा धोका कायम आहे. त्यामुळे घसरणीच्या काळात दर्जेदार फंड्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढवणे शहाणपणाचे ठरेल. वाचा -एकदाच गुंतवणूक करुन दरमहा ११,००० रुपये 'पेन्शन' मिळवा; SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ऐतिहासिक घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण | Achira News