टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाने आयसीच्या वार्षिक टी-२० क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखले आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मंगळवारी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत टीम इंडियाने 'नंबर वन'चा ताज कायम राखला आहे. इंग्लंड क्रिकेट संघ दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला अन् टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मार्चमध्येआयसीसीटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा यशस्वीरित्या बचाव करुन दाखवला. एवढेच नाही तर विक्रमी तिसऱ्यांदा भारतीय संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. या कामगिरीच्या जोरावर आता भारतीय संघाने वार्षिक टी-२० क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर नव्या क्रमवारीत टीम इंडियापाठोपाठ लागतो इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा नंबरआंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ताज्या क्रमवारीत मे २०२५ नंतर खेळल्या सर्व सामन्यांसह त्याआधीच्या दोन वर्षांतील सामन्यांतील ५० टक्के कामगिरीच्या आधारावर नवी क्रमवारी तयार करण्यात आली आहे. यात टीम इंडिया २७५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडच्या खात्यात (२६२) तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २५८ गुणांसह इंग्लंडच्या अधिक जवळ पोहोचला आहे. पाकिस्तान कितव्या स्थानी? आयसीसीच्यानव्या क्रमवारीत अव्वल सात संघांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड (२४७), दक्षिण आफ्रिका (२४४), पाकिस्तान (२४०) आणि वेस्ट इंडिज (२३३) हे संघ अनुक्रमे चौथ्या ते सातव्या स्थानावर कायम आहेत. श्रीलंकेला फटका, अमेरिकेा फायद्यात श्रलींकेच्या संघाला ६ रेटिंग पॉइंट्सचा फटका बसला अशून ते आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरले आहेत. दुसरकीडे बागंलादेशच्या संघाने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तानचा संघ दहाव्या स्थानावर असून झिम्बाब्वे आणि आयर्लंड अनुक्रेम ११ व्या आणि १२ व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या संघाने दोन स्थानांच्या सुधारणेसह १३ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
ऐतिहासिक टी-20 विश्वचषक विजयानंतर भारताने आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.